घरताज्या घडामोडीकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा रद्द

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा रद्द

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson) यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. बोरिस जॉन्सन पुढच्या आठवड्यात भारतात येणार होते, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता आता दौरा रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी ते २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते. पण त्यावेळेस देखील कोरोनाच्या कारणामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. सलग दोनदा बोरिस जॉन्सन यांचा भारत दौऱ्या रद्द केला आहे. ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संकटामुळे त्यांनी येत्या आठवड्यातला भारत दौरा रद्द केला आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच येत्या रविवारपासून भारताच्या ४ दिवशी दौऱ्यावर बोरिस जॉन्सन येणार होते. पण सध्या देशात कोरोनाचा विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. तसेच आज रात्री १० वाजल्यापासून दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अनेक ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकण्याचा सल्ला दिला होता. पण अजून ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले नाही आहे. जर भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले तर भारतातील प्रवासावर बंदी टाकण्यात येईल.

- Advertisement -

रद्द करण्यात आलेल्या या भारत दौऱ्यावेळी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार होती. माहितीनुसार भविष्यातील योजनांवर चर्चा केली जाणार होती. दोन्ही देशांकडून बोरिस जॉन्सन यांच्या दौऱ्याला मान्यता मिळाली होती. पण बोरिस यांचा भारत दौरा नेमका कसा असेल? याबाबत अद्यापही स्पष्ट करण्यात आले नव्हते. २६ एप्रिलपासून बोरिस यांचा दौरा सुरू होणार होता. दिल्लीसह मुंबई आणि पुण्याला बोरिस भेट देणार होते. त्यांच्या दौऱ्याचा कालावधी देखील कमी करण्यात आला होता. पण आज अखेर पुन्हा एकदा बोरिस यांचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -