Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना करोनाची लागण

boris johnson
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन

करोनाने युरोपमध्ये सध्या कहर केल आहे. स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेन कॅल्वो यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोनाची चाचणी केली असता करोना पॉझिटीव्ह आली. गेल्या २४ तासांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली. त्यानंतर करोनाची चाचणी करण्यात आली. बोरिस जॉनसन यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. बोरिस जॉनसन (वय ५५) यांना गुरुवारी सौम्य लक्षणे आढळून आली. इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्रोफेसर ख्रिस व्हिट्टी यांच्या वैयक्तिक सल्ल्यानुसार पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची करोनाची चाचणी घेण्यात आली.

“गेल्या २४ तासांमध्ये माझ्यात सौम्य लक्षणे दिसून आली. त्यानंतर करोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्रप्त झाला. या चाचणीमध्ये करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर मी स्वत:ला वेगळं केलं आहे. परंतू मी व्हिडीओ-कॉन्फरन्सद्वारे सरकारच्या नेतृत्व करत राहीन,” असे बोरिस जॉनसन म्हणाले.