Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश CoronaVirus: लहान मुलांवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम; बरे झाल्यानंतर ७ महिन्यांपर्यंत लक्षण कायम

CoronaVirus: लहान मुलांवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम; बरे झाल्यानंतर ७ महिन्यांपर्यंत लक्षण कायम

कोरोना चाचणीनंतर १५ आठवड्यांनी केले लहान मुलांचे परिक्षण

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू असून तो पूर्णतः संपलेला नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक आव्हाने वाढत आहे. या धोकादायक व्हायरसचा सखोल परिणाम कोरोना संसर्ग झालेल्या लोकांवर अधिक दिसून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक कोरोनाग्रस्तांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, एका नव्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की, कोरोनाच्या विळख्यात असलेल्या मुलांवरही या विषाणूचा सखोल परिणाम होऊ शकतो.

११ ते १७ वयोगटातील मुलांचे केले परिक्षण

या अभ्यासानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनंतरही प्रत्येक सातपैकी एका मुलामध्ये या विषाणूशी संबंधित लक्षणे दिसू शकतात. यूकेच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या संशोधकांनी हा अभ्यास मुलांवर कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामांवर केला आहे. या संदर्भातील सर्वात मोठा अभ्यासात इंग्लंडमधील ११ ते १७ वयोगटातील ३ हजारांहून अधिक मुलांवर सर्वेक्षण करण्यात आले.

कोरोना चाचणीनंतर १५ आठवड्यांनी केले परिक्षण

- Advertisement -

यंदा २०२१ च्या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान करण्यात आलेल्या पीसीआर चाचणीमध्ये ही मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली. या कालावधीत कोरोना निगेटिव्ह आढळलेल्या समान वयाच्या ३ हजार ७३९ मुलांचाही अभ्यास केला गेला. हे परीक्षण कोरोना चाचणीनंतर १५ आठवड्यांनी करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १४ टक्के मुलांमध्ये तीन किंवा त्याहून जास्त लक्षणे दिसून आली. तर ७ टक्के मुलांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक लक्षणे आढळली. यामध्ये डोकेदुखी आणि थकवा अशी लक्षणं मुलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या असल्याचे समोर आले, असे अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि यूसीएलचे प्राध्यापक टेरेन्स स्टीफनसन यांनी सांगितले.


- Advertisement -