घरताज्या घडामोडीUkraine Russia War : रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनने उडवले तीन पूल, युद्ध...

Ukraine Russia War : रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनने उडवले तीन पूल, युद्ध पेटले

Subscribe

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर ताबा मिळवणार असून ही लढाई ऐतिहासिक वळणावर पोहोचली आहे. कीवच्या बाहेर रशियन आणि युक्रेन सैन्यांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनने आपल्या शहरातील तीन पूल उडवून दिले आहेत. राजधानी कीवच्या बाहेर रशियन सैन्याशी लढा देत असल्याचे युक्रेन लष्कराचे म्हणणे आहे.

- Advertisement -

रशियन सैन्याने आज राजधानी कीववर सहा क्षेपणास्त्रांसह हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान रशियाचे एक विमान युक्रेनच्या लष्कराकडून पाडण्यात आले आहे. ज्या ठिकाणी निवासी इमारत कोसळली आहे. तिथे आग लागली आहे.

रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या सैनिकांना शस्त्र खाली ठेवण्याचा इशारा दिला आहे. मात्र, युक्रनने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे. यानंतर रशियाने राजधानी कीववर हवाई हल्ला करण्यात येत आहेत. कीवमधील निवासी भागात सलग सहा स्फोट झाले आहेत. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियाचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. रशियन सैन्य पहाटे ४ वाजल्यापासून येथे क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. रशियाच्या क्रूझ क्षेपणास्त्राने राजधानी कीवमध्ये युक्रेनचे Su27 जेट पाडले आहे.

- Advertisement -

रशियन सैनिक कीवपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. तसेच युक्रेनने रशियावर सायबर हल्ला केला असून रशियाच्या अनेक वेबसाईट ठप्प झाल्या आहेत. युक्रेनची राजधानी किवमध्ये रशियाचे हल्ले पहाटे ४ वाजता सुरू झाले, कीवमध्ये आकाशातून आगीचा वर्षात होताना दिसला. दरम्यान, युक्रेनने कीवमध्ये रशियन विमान पाडल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा : Yashwant Jadhav IT Raid: जे डर्टी नेते आहेत त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार – किरीट सोमय्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -