घरताज्या घडामोडीUkraine-Russia War: युद्धात रशियाने 12 हजार सैनिक गमावले, युक्रेनचा दावा

Ukraine-Russia War: युद्धात रशियाने 12 हजार सैनिक गमावले, युक्रेनचा दावा

Subscribe

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. अजूनही रशिया युक्रेन अनेक शहरावर हल्ले करत आहे. या युद्धादरम्यान आतापर्यंत रशियाने 12 हजार सैनिकांना गमावल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करून हा दावा केला आहे. युक्रेनचा दावा आहे की, युद्धात आतापर्यंत रशियाचे 17 टँक, 1070 लढाऊ वाहन, 120 तोफा, 49 एअरक्राफ्ट, 81 हेलिकॉप्टर, 60 फ्लू टँक 24 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत नष्ट केले आहेत.

यापूर्वा रशियाने म्हटले होते की, ‘युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी कीवसोबत बातचीत होत आहे.’ रशियाने या गोष्टी जोर दिला आहे की, ‘मॉस्कोचे सैनिक युक्रेनी सरकार पाडण्यासाठी काम करत नाहीये.’

- Advertisement -

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया जखारोवाने एका पत्रकार परिषदेरम्यान कीवसोबत तीन वेळा बातचीत करतानाचा उल्लेख करत म्हणाले की, ‘काही प्रगती झाली आहे.’ दरम्यान रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता टर्कीमध्ये बैठक होणार आहे.

- Advertisement -

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले की, ‘त्यांनी देशाला ‘डी-नाजिफाय’ करण्यासाठी युक्रेनमध्ये सैनिक पाठवले आहे.’ 24 फेब्रुवारीपासून रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे.

रशिया सर्वाधिक निर्बंध लादलेला देश

डेटाबेस कॅस्टेलम डॉट एआयने म्हटले की, युक्रेनवर हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वी 22 फेब्रुवारीपासून रशियाने संयुक्त राज्य अमेरिका आणि त्याचे यूरोपीय सहाकार्यांद्वारे लावलेल्या निर्बंधात वाढ झालेले पाहिले.

कॅस्टेलम डॉट आयनुसार, २२ फेब्रुवारीच्या अगोदर रशियाविरोधात 2 हजार 754 निर्बंध लावले होते. परंतु त्यानंतर जसे जसे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धासंबंधित वक्तव्य केली तसतसे निर्बंध वाढू लागले. 2 हजार 778 नवे निर्बंध रशियावर लावले गेले.


हेही वाचा – रशियाशी लढणे नाटोच्या आवाक्यातलं नाही; वोलोदिमिर झेलेन्स्कींनी नाटोत सहभागाचा अट्टहास सोडला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -