घरदेश-विदेशUkraine Crisis : रशिया युक्रेनवर आक्रमण का करु शकतो? अमेरिकेची भूमिका काय?

Ukraine Crisis : रशिया युक्रेनवर आक्रमण का करु शकतो? अमेरिकेची भूमिका काय?

Subscribe

सध्या रशिया आणि यूक्रेनमधला तणाव वाढला आहे. याबाबत १९ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले होती की, रशिया यक्रेनवर हल्ला करेल. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना असे केल्यामुळे पचतावाल असा इशारा दिला आहे. जो बायडन महिन्याभराच्या तणावपूर्ण वातावरणानंतर हे बोलले होते. कारण गेल्या काही महिन्यापासून रशियाने यूक्रेनसोबत असलेल्या सीमाभागावर मोठ्या प्रमाणात सैनिकांचा फौजफाट तैनात केला आहे. एक लाकांहून अधिक सैनिक तैनात केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या रशिया यूक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या संयुक्त सैन्य अभ्यासाठी रशियाने जानेवारीच्या मध्यापासून बेलारुसमध्ये सैनिकांना पाठवण्यास सुरुवात केली आहे. हा देशाची सीमा यूक्रेन आणि रशियाला जोडून आहे. आपल्या सैन्य दलाला माघारी बोलण्यापूर्वी पुतिन यांनी अमेरिकेकडून सुरक्षेसाठी काही मागण्या केल्या होते. पुतिन यांनी यूक्रेनच्या नाटोमध्ये प्रवेशावर बंदी घालण्याची आणि नाटोने पूर्व युरोपातील बर्‍याच भागातून सैन्य आणि शस्त्रे मागे घेण्याचा करार करावा अशी मागणी केली होती.

- Advertisement -

दरम्यान २०१४ मध्ये पुतिन यांनी यूक्रेनच्या क्रीमिया भाग आपल्या देशात सामिल केला होता. युक्रेनचा इतिहास गुंतागुंतीचा असून यातून युक्रेन नेहमी धोक्यात का असतो याची माहिती मिळते.

युक्रेन आणि रशियाचे संबंध

युक्रेनला ३० वर्षांपूर्वी सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. भ्रष्ट्राचारावर मात करण्यासाठी आणि अंतर्गत फुटीचे राजकारण संपवण्यासाठी युक्रेनचा संघर्ष सुरु आहे. युक्रेनचा पश्चिम भाग सामान्यत: पश्चिम युरोपसह एकीकरणास अनुकूल आहे. तर देशाचा पूर्व भाग रशियाशी घनिष्ठ संबंधांसाठी अनुकूल आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव फेब्रुवारी 2014 मध्ये शिगेला पोहोचला, जेव्हा हिंसक निदर्शकांनी युक्रेनचे रशियन समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना सत्तेवरून हटवले. या आंदोलनाला आता ‘रिव्होल्यूशन ऑफ डिग्निटी’ म्हणून ओळखले जाते. त्याच वेळी, रशियाने क्रिमियाला जबरदस्तीने आपल्या देशात जोडले. युक्रेन हा एक असुरक्षित देश असून येथे एक अस्थिर सरकार आहे. तसेच लष्कराची देखील कोणतीच तयारी या देशाकडे नाही. पुतिन यांनी ताबडतोब पूर्व युक्रेनच्या डॉनबास भागात हल्ला केला. युक्रेनचे सरकारी सैन्य आणि रशियन समर्थित फुटीरतावादी यांच्यातील सशस्त्र संघर्षात 14,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

- Advertisement -

युक्रेनला काय हवे आहे?

डोनबासमधील रशियाच्या सैन्याने क्रिमियावर कब्जा करण्यासाठी युक्रेनच्या पाश्चात्य अभिमुखतेसाठी सार्वजनिक समर्थन वाढले आहे. युक्रेनच्या सरकारने म्हटले की, 2024 मध्ये युक्रेन युरोपीय संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज करेल, तसेच नाटोमध्ये सहभागी होण्याची महत्वाकांक्षा देखील आहे. 2019 मध्ये सत्तेत आलेल्या युक्रेनी राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी डॉनबास प्रदेशात भ्रष्टाचारविरोधी, आर्थिक नूतनीकरण आणि शांतता यासाठी मोहीम चालवली.

पुतिन युक्रेनवर हल्ला करण्याची धमकी का देत आहेत?

युक्रेनच्या सीमेवर लष्करी तैनाती वाढवण्याचे कारण म्हणजे पुतिन यांच्यातील दडपणाची भावना. रशियन हितसंबंधांचा पुरस्कार करणारे आणि पद सोडल्यानंतर रशियन कंपन्यांमध्ये सामील होणारे पाश्चात्य राजकीय नेते पुतिन यांना माहीत आहेत. पाश्चात्य देशांनी 2020 च्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपामुळे आणि कंपन्या आणि यूएस सरकारसाठी काम करणार्‍या सुमारे 18,000 लोकांवर सायबर हल्ले केल्याबद्दल बहुते निर्बंध लादले आहेत. राजधानी मिन्स्कमधील निदर्शनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याबद्दल पुतिन यांनी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचे समर्थन केले आहे. अनेक प्रसंगी, पुतिन यांनी निरीक्षण केले आहे की काही प्रमुख पाश्चात्य राजकीय नेत्यांनी रशियाशी युती केली आहे. या आघाड्या पाश्चात्य देशांना पुतिन यांच्या विरोधात एकत्रित आघाडी बनवण्यापासून रोखू शकतात.

अमेरिकेला संघर्षात का सामील व्हायचे आहे?

क्रिमियावर कब्जा करुन आणि डॉनबास संघर्षाला पाठिंबा देऊन रशियाने युक्रेनसाठी बुडापेस्ट मेमोरँडम ऑफ सिक्युरिटी अॅश्युरन्सचा भंग केला आहे. हा अमेरिका, ब्रिटन आणि रशिया यांच्यातील 1994 चा करार आहे ज्याचे उद्दिष्ट युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आण्विक शस्त्रे सोडण्याच्या वचनबद्धतेच्या बदल्यात आहे.


Republic Day 2022 : महाराष्ट्रातील सात अग्निशमन


अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -