घरदेश-विदेशUkraine Crisis : अमेरिकन नागरिकांनो तातडीनं युक्रेन सोडा; रशियाकडून हल्ल्याच्या भीतीनं बायडेन...

Ukraine Crisis : अमेरिकन नागरिकांनो तातडीनं युक्रेन सोडा; रशियाकडून हल्ल्याच्या भीतीनं बायडेन सरकारचा इशारा

Subscribe

युक्रेन संकटादरम्यान आज क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा इशारा दिला आहे. रशियाकडून हल्ल्याच्या भीतीनं बायडेन सरकारचा हा इशारा दिल्याचे म्हटले जातेय. यावर अमेरिकचे राष्ट्रपती म्हणाले की, आता परिस्थिती खूप वेगळी आहे आणि ती खूप वेगाने बदलतेय. याआधीही रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकेने केला होता. तसेच, बायडेन यांनी यापूर्वी मॉस्कोला संभाव्य लष्करी कारवाई संदर्भात इशारा दिला आहे. अमेरिकेने नाटो सहयोगींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना मॉस्कोमधील सात प्रमुख संघर्षांबाबत इशारा दिला आहे. NBC ला दिलेल्या मुलाखतीत बायडेन म्हणाले की, ‘अमेरिकन नागरिकांनी युक्रेनमधून तातडीने बाहेर पडले पाहिले. कारण देश सध्या जगातील सर्वात मोठ्या सैन्याचा सामना करत आहे. ही खूप वेगळी परिस्थिती आहे आणि परिस्थिती खूप वेगाने बिघडू शकते. युक्रेनवर आक्रमण झाल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेसह अनेक देशांनी दिला आहे.

- Advertisement -

युक्रेन संकटादरम्यान आज क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

युक्रेन, अफगाणिस्तानचे संकट आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता हस्तक्षेप या चिंतेच्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री आज मेलबर्नमध्ये एकत्र बैठक घेत आहेत. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॉरिस पायने यांनी चर्चेच्या एक दिवस आधी गुरुवारी सांगितले की, या बैठकीत अँटी-कोरोनाव्हायरस संसर्ग लसींचे वितरण, दहशतवादविरोधातील लढा, सागरी सुरक्षा आणि हवामान बदलामध्ये सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

इंडो-पॅसिफिकमधील सर्व देश स्वतःचे धोरणात्मक निर्णय घेण्यास सक्षम आहेत याची खात्री करण्याच्या गरजेवर मंत्री मॉरिस पायने यांनी भर दिला. त्यांच्या या वक्तव्याकडे चीनच्या या भागात वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वनभूमीवर पाहिले जात आहे. पायने यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्र मंत्री हयाशी योशिमासा हे उपस्थित राहिले आहेत.

- Advertisement -

अमेरिकन आर्मीचे लेफ्टनंट जनरल एरिक कुरिल्ला यांनी मंगळवारी कायदेकर्त्यांना इशारा दिला की, जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर सीरियासह मध्य पूर्वेमध्ये व्यापक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. इराण हा अमेरिका आणि या भागातील मित्र राष्ट्रांसाठी मोठा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुरिल्ला यांनी मध्यपूर्वेतील सर्वोच्च अमेरिकन कमांडरच्या पदासाठी सिनेटच्या सुनावणीदरम्यान सदन सशस्त्र सेवा समितीला सांगितले की, चीन सेंट्रल कमांड क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे आणि तेथे खर्च वाढवत आहे. या क्षेत्रात अमेरिकेलाअफगाणिस्तानातील अतिरेकी कारवायांबाबत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आवश्यक असलेल्या देशांचाही समावेश आहे.


मोटर अपघात दाव्यांच्या पेमेंटसंबंधित 40 वर्षे जुन्या नियमांत सुधारणा करा; SC चे राज्यांना निर्देश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -