घरताज्या घडामोडीRussia Ukraine dispute: अमेरिकेने रशियाची अट नाकारली; रशिया-यूक्रेनमध्ये आणखीन वाढला तणाव

Russia Ukraine dispute: अमेरिकेने रशियाची अट नाकारली; रशिया-यूक्रेनमध्ये आणखीन वाढला तणाव

Subscribe

रशिया आणि यूक्रेनमधील तणाव काही कमी होताना दिसत नाहीये. अशातच अमेरिकेने रशियाची एक महत्त्वाची अट नाकारल्यामुळे रशिया आणि यूक्रेनमधील तणाव आणखीन वाढला आहे. अमेरिकेने यूक्रेनला उत्तर अटलांटिक करार संघटनाचा (NATO – नाटो) भाग बनवण्यापासून रोखण्याची रशियाची अट नाकारली आहे. रशियाची प्रमुख मागणी फेटाळल्यानंतर आता यूक्रेनच्या वादग्रस्त क्षेत्रावरील तणाव अधिक वाढला आहे. तर रशियन संसद भवन ‘क्रेमलिन’नेही स्पष्ट केले की, आता नाटो देशांसोबत करार होण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे.

यूक्रेनची समस्या सोडविण्यासाठी रशियाच्या अटीबाबत विचारले असताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, रशियाच्या अटीचा फारसा काही उपयोग नव्हता. रशियाने आपल्या पश्चिम सीमेजवळील नाटो सैन्य संघटनेचा विस्तार आणि इतर संबंधित सुरक्षेच्या मुद्द्यांसंदर्भात आपली चिंतेची एक यादी सादर केली होती. त्यामध्ये नाटो देशांनी यूक्रेन आणि इतर देशांच्या गठबंधनात सामील करण्याची मागणी केली होती, तिच मागणी अमेरिकेने नाकारली आहे.

- Advertisement -

नाटो देशांचे मत आहे की, रशियाची अट स्वीकारल्यानंतर तो क्षेत्रात आपले प्रभुत्व अबाधित वाढवेल. यामुळे क्षेत्रात असंतुलन होण्याचा धोका वाढले. या अटी नाकारल्यानंतर रशिया संसदेने स्पष्ट केले की, आता करार करण्याची आशा फारशी राहिली नाही. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गैदे लावरोव म्हणाले की, आम्ही राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवू परंतु अट नाकारल्यानंतर करार करणे खूप कठीण झाले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंज्ञी अँटनी ब्लिंकन म्हणाले की, त्यांचा देश यूक्रेन संकटासोबत सामान करण्यासाठी सर्व प्रकारे तयार आहे. रशियात अमेरिकन राजदूत जॉन सुलविन यांनी मॉस्कोमध्ये रशिया सरकारला काही कागदपत्र दिल्यानंतर लगेच पत्रकारांना सांगितले की, सर्व काही सांगितले आहे, यामुळे एक गंभीर राजनैतिक मार्ग उघडेल, रशियाने यांची निवड केली पाहिजे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, आम्ही दिलेल्या कागदपत्रात अमेरिका, आमचे सहयोगी आणि भागीदारांना रशियाच्या काही उचललेल्या पाऊलामुळे चिंता आहे. ज्यामुळे सुरक्षा कमकुवत होईल.

- Advertisement -

हेही वाचा – रशिया-यूक्रेन तणाव; ७ वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर पार; २०१४ नंतर उच्चांकी वाढ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -