घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले, 'माझी सुटका...

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले, ‘माझी सुटका नको, दारुगोळा हवा’

Subscribe

रशियाकडून सलग तिसऱ्या दिवशी युक्रेनमध्ये हल्ला सुरू आहे. राजधानी किवमध्ये रशियन फौजांची धडक झाली असून निवासी इमारतींवर हल्ले केले जात आहेत. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी युक्रेन सोडण्याची अमेरिकेची ऑफर फेटाळून स्पष्ट सांगितले की, ‘माझी सुटका नको, दारुगोळा पाहिजे.’ ‘शिवाय कोणत्याही परिस्थितीत पळून जाणार नाही,’ असे युक्रेनचे राष्ट्रपती म्हणाले.

- Advertisement -

काल, शुक्रवारी रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेंस्की देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की, ‘ते अजूनही आपल्या युक्रेन देशात आहेत.’

- Advertisement -

अमेरिकेने दिली होती ‘ही’ ऑफर

अमेरिकेकडून युक्रेनच्या राष्ट्रपतींना देश सोडण्याची ऑफर मिळाली होती. परंतु राष्ट्रपती झेलेंस्की यांनी स्पष्ट शब्दात याला नकार दिला. ते म्हणाले की, ‘मी पळून जाणाऱ्यांमधला नाही. तुम्हाला माझी मदत करायची असेल तर हत्यारे द्या, दारुगोळा द्या.’ तसेच ट्विट करून म्हणाले की, ‘इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या संभाषणाने नवा दिवस आणि राजनैतिक प्रयत्न सुरू झाले आहेत. युक्रेनच्या दिशेने आमच्या मित्रराष्ट्रांकडून शस्त्रास्त्रे आणि साहित्य पाठवण्यात आले आहे. युद्धविरोधी आघाडी सक्रीय झाली आहे.’

स्वीडन युक्रेनच्या मदतीसाठी आला पुढे

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक गंभीर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेन इतर देशांकडून मदत करण्याची मागणी करत आहे. स्वीडन आता युक्रेनच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी स्वीडनचे आभार मानले आहेत. झेलेंस्की ट्वीट करून म्हणाले की, ‘स्वीडन लष्करी, तांत्रिकदृष्ट्या मदत करत आहे. त्यांच्या समर्थनासाठी स्वीडनच्या पंतप्रधानांचे आभार. आपण एकत्र पुतीन विरोधी गठबंधन निर्माण करत आहे.’


हेही वाचा – Russia-Ukraine War: युक्रेनने महिला-मुलांना देश सोडण्याची दिली परवानगी, पण पुरुषांना युद्धासाठी थांबवले


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -