घरदेश-विदेशयुक्रेनमधील विध्वसांचे दृश्य; रस्त्यावर, ATM बाहेर नागरिकांच्या लांब रांगा

युक्रेनमधील विध्वसांचे दृश्य; रस्त्यावर, ATM बाहेर नागरिकांच्या लांब रांगा

Subscribe

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये लष्करी कारवाया करण्याची घोषणा केली. युक्रेनने दिलेल्या धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. तसेच युक्रेन आणि रशियामधील युद्ध आता अटळ असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे. त्यामुळे रशियाच्या लष्करी कारवाईच्या घोषणेमुळे युक्रेनमध्ये स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येत आहे. रशियातील या विध्वंसक परिस्थितीमुळे येथील रस्त्यांवर आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या लांबच- लांब रांगा पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

रशियन सैन्याने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांनी रशियाच्या लष्करी कारवाईत कोणताही हस्तक्षेप करु नये , अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली आहे.

- Advertisement -

रशियाच्या हल्ल्यांनंतर युक्रेनमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी धुराचे मोठ- मोठे लोट उठताना दिसतायत. त्याचबरोबर रस्ते आणि एटीएमसमोर नागरिकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

रशियाने युक्रेनची लष्करी हवाई संरक्षण मालमत्ता आणि लष्करी तळं नष्ट केल्याचे सांगितले आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची हवाई लष्करी संरक्षण संपत्ती नष्ट झाली आहे. तसेच युक्रेनच्या लष्करी तळांच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्य़ा आहेत. यात पाच विमानांचे मोठे नुकसान करण्यात आले,

युक्रेनच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तर पूर्व युक्रेनच्या क्रॅमतोर्स्क शहरातील एटीएमबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर दुकानेही बंद झाली आहेत.

रशियाने युद्ध पुकारल्यानंतर लोक युक्रेनची राजधानी कीव सोडण्यासाठी ट्रेनची वाट पाहत आहेत.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -