घरताज्या घडामोडीRussia-Ukraine Crisis: जगातील सर्वात मोठ्या CERN वैज्ञानिक संस्थेतून रशियाला दाखवला बाहेरचा रस्ता

Russia-Ukraine Crisis: जगातील सर्वात मोठ्या CERN वैज्ञानिक संस्थेतून रशियाला दाखवला बाहेरचा रस्ता

Subscribe

रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अमेरिका सतत रशियावर निर्बंध लादत आहे. तसेच इतर देश आर्थिक दृष्टीने रशियाला मोठा फटका बसण्यासाठी निर्बंध लादत आहे. असे असले तरीही रशिया सतत युक्रेनच्या मोठ मोठ्या शहरांवर हल्ले करत आहे. काल, मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन गॅस, तेल आणि ऊर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठ्या द युरोपियन काऊंसिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च (CERN) या वैज्ञानिक संस्थेने एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी रशियासोबत भविष्यातील सर्व करार सध्या रोखले आहेत. शिवाय रशियाला निरीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सर्व रशियन वैज्ञानिक संस्थेसोबत नवे करार रोखले आहेत. कारण युक्रेनमध्ये अजूनही रशियन सैन्य हल्ला करत आहेत.

- Advertisement -

CERN फॅसिलिटीमध्ये रशिया वैज्ञानिकांवर निर्बंध लादण्यासाठी सुरुवातीला मत कमी पडली होती, परंतु त्यानंतर युक्रेनियन वैज्ञानिकांनी केलेल्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. सीईआरएनने युक्रेन वैज्ञानिकांना आपल्या जास्तीत जास्त प्रोजेक्ट्समध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनला सहकार्य करून हाय एनर्जी फिजिक्ससंबंधित प्रयोगांमध्ये घेतले जाईल.

CERN हे लार्ज हॅड्रन कोलायडर (Large Hadron Collider) चालवते. हे जगातील सर्वात मोठे अणू स्मॅशर आहे. याच फॅसिलिटीने 2012मध्ये हिग्स बोसोन (Higgs Boson) शोधले होते. या संशोधनात जगातील 23 देशांचा समावेश होता. सात असोसिएटेड सदस्य होते. युक्रेन त्यानंतर यात सामील झाला. तो फॅसिलिटीला निधी देता. तर रशियाचे पद हे अमेरिकेप्रमाणे निरीक्षकाचे आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा निधी द्यावा लागत नाही.

- Advertisement -

जगातील 12 हजार वैज्ञानिक CERNमध्ये काम करतात. ज्यामध्ये रशियातील 1000 वैज्ञनिक काम करत आहे. म्हणजे 8 टक्के रशियाचे वैज्ञानिक आहेत. CERN काऊंसिलने एका बैठकीनंतर म्हटले की, 23 टक्के भागीदार असलेल्या सदस्यांनी युक्रेनवर रशियाने केलेला हल्ल्याचा निषेध केला आहे. ही मानवतावादी विरोधातील कारवाई आहे. यामुळे लोकांचे जीव जात आहेत. दरम्यान प्रयोगशाला काऊंसिल म्हणाले की, CERN व्यवस्थापन, त्यांचे कर्मचारी आणि सर्व इतर देशांमधील वैज्ञानिक युक्रेनच्या मदतीसाठी काम करतील. तेथील लोकांना मदत करतील. शिवाय या प्रयोगशाळेतील असलेल्या सध्याच्या युक्रेनच्या सर्व वैज्ञानिकांना संपूर्ण पाठिंबा दिला जाईल.


हेही वाचा – Russia Ukraine War: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियाकडून येणाऱ्या तेल आयातीवर बंदी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -