घरदेश-विदेशकाबुलमध्ये युक्रेनचं विमान झालं हायजॅक! थेट पोहोचलं ईराणला

काबुलमध्ये युक्रेनचं विमान झालं हायजॅक! थेट पोहोचलं ईराणला

Subscribe

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये युक्रेनचे विमान हायजॅक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचा मार्ग इराणकडे वळवण्यात आला आहे. युक्रेनच्या मंत्र्याच्या हवाल्याने दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यासह हे विमान युक्रेनमधील लोकांच्या मदतीसाठी गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात आले होते. रशियाची रशियन वृत्तसंस्था TASS युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री युवगेनी येनिन (Yevgeny Yenin) यांच्या हवाल्याने सांगितले, ‘गेल्या रविवारी आमचे विमान इतर लोकांनी हायजॅक केले होते. मंगळवारी हे विमान आमच्याकडून हिसकावून घेण्यात आले. युक्रेनियन लोकांना एअरलिफ्ट करण्याऐवजी, ते प्रवाशांच्या अज्ञात लोकांसह इराणला पाठवण्यात आले. इव्हॅक्युएशनच्या पुढील तीन योजना यशस्वी झाल्या नाहीत कारण आमचे लोक विमानतळावर पोहोचू शकले नसल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. युवगेनी येनिनच्या मते, जेव्हा विमान काबूल विमानतळावरून उड्डाण करणार होते, तेव्हा काही लोक त्यात घुसले आणि त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले. उप परराष्ट्र मंत्री युवगेनी येनिन यांच्या मते, गेल्या रविवारी आमचे विमान काही लोकांनी हायजॅक केले होते. मंगळवारी आमच्याकडून विमान चोरीला गेले. काबुल विमानतळावरून युक्रेनियन लोकांना विमानात नेण्याऐवजी ते इतर लोकांसह निघाले आणि इराणकडे थेट पोहोचले. यानंतर आम्ही आमच्या माणसांना बाहेर काढण्याचे आणखी तीन वेळा प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले.

- Advertisement -

समोर आलेल्या काही अहवालांनुसार, युक्रेन सरकार विमान परत घेण्यासाठी चर्चा करत आहे. विमानाची सध्या असलेली स्थिती मसद इराण अशी नोंद करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणने असे सांगितले की, विमानात इंधन भरल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने विमानाने उड्डाण केले.


हे ‘पोलिसजीवी सरकार, आम्ही राणेंच्या पाठीशी – फडणवीस

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -