घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: '१०५ दिवस व्हेंटिलेटरवर काढल्यानंतर फातिमा कोरोनातून बरी झाली'

Coronavirus: ‘१०५ दिवस व्हेंटिलेटरवर काढल्यानंतर फातिमा कोरोनातून बरी झाली’

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे जगभरातून आश्चर्यकारक अशा घटना समोर येत आहेत. शंभरपेक्षा अधिक वय असणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनावर मात केलेली आहे. अगदी नवजात बालकांनीही कोरोनाला हरवलेले आहे. तर काही रुग्णांना कोरोनाने गिळंकृत केले आहे. मात्र ब्रिटनमध्ये एक चमत्कारीक आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. एक ३५ वर्षीय महिला तब्बल १३० दिवस कोरोनामुळे झालेल्या आजारांविरोधात लढत होती. कोरोना विरोधात सर्वाधिक काळ लढलेल्या रुग्णांमध्ये आता या महिलेचा समावेश झालेला आहे. फातिमा ब्रिडल असे या महिलेचे नाव असून ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.

फातिमा आपल्या ५६ वर्षीय पतीसोबत मोरक्को येथे सहलीसाठी गेली होती. एक महिन्यानंतर जेव्हा ती परतली तेव्हा ती अचानक आजारी पडली. तिच्या पतीमध्येही देखील कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. फातिमाला ब्रिटनमधील साऊथपैंटन (Southampton General Hospital) येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १०५ दिवस फातिमा व्हेंटिलेटरवर होती. खरंतर एप्रिल महिन्यातच ती कोरोना निगेटिव्ह झाली होती. मात्र कोरोना व्हायरसने तिला न्यूमोनिया आजार दिला. कोरोनाने तिच्या फुफ्फुसांना हानी पोहोचली होती. डॉक्टरांनी सांगितले की, फातिमा जरी बरी झाली असली तरी तिचे फुफ्फुस आधीसारखे पुर्ण क्षमतेने काम करु शकणार नाहीत.

- Advertisement -

फातिमा बरी झाल्यानंतर तिचा पती ट्रेसीने सांगितले की, माझ्या पत्नीला डॉक्टर आणि नर्सेसनी एक नवीन जीवन दिले आहे. आमच्यासाठी हे स्वप्नापेक्षा काही कमी नाही. मी याबद्दल डॉक्टर आणि नर्सेसचे आभार व्यक्त करतो. तर ब्रिटनचे आरोग्य खात्याचे सचिव मैट हँकॉंक (Matt Hancock) यांनी फातिमा बरी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच फातिमाचे उदाहरण हे ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था नागरिकांसाठी सदैव तत्पर असल्याचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -