घरताज्या घडामोडीब्युरोक्रेसी चपला उचलण्यासाठीच असतात---उमा भारती यांच वादग्रस्त विधान

ब्युरोक्रेसी चपला उचलण्यासाठीच असतात—उमा भारती यांच वादग्रस्त विधान

Subscribe

उमा भारती यांनी ब्युरोक्रेसीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उमा भारती यांनी ब्युरोक्रेसीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ब्युरोक्रेसी वगैरे असं काहीही नसतं असं त्या म्हणाल्या आहेत. पण एवढ्यावरच त्या थांबल्या नसून ब्युरोक्रेसी चपला उचलण्यासाठीच असतात असंही त्या बोलल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

उमा भारती भाजपच्या फायर ब्रँड नेत्या असून वादग्रस्त विधानासाठी त्या प्रसिद्ध आहेत. यावेळी त्यांनी थेट ब्युरोक्रेसीतील आयएएस,आयपीएस,आयआरएस , सनदी अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केलं आहे. ब्युरोक्रेसी वगैरे असं काही नसून ते फक्त आमच्या चपला उचलण्यासाठीच असतात असं विधान त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर आम्ही देखील त्यांना तसं करु देतो हे देखील त्या म्हणाल्या. एवढ्यावरचं त्या थांबल्या नसून मी केंद्रात ११ वर्षापासून आहे. मुख्यमंत्रीही होते. त्यामुळे मला सगळं माहित असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. सगळ्यात आधी आमच्याशी चर्चा केल्यानंतरच ब्युरो फाईल तयार करत असल्याचं भारती यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच ही सगळी फालतूगिरी असते असंही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

उमा भारती यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो जुना असल्याचं बोललं जात आहे. यावर अद्यापपर्यंत उमा भारती यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -