Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उमा भारतींकडून दारुच्या दुकानाची तोडफोड, दगडफेक करत फोडल्या बाटल्या

उमा भारतींकडून दारुच्या दुकानाची तोडफोड, दगडफेक करत फोडल्या बाटल्या

Subscribe

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारतींना दारुच्या दुकानाची तोडफोड केली आहे. दुकानावर जाऊन दगडफेक करत दारुबंदी करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. उमा भारती यांनी दगडफेक करत दारुबंदीचे अभियान सुरु केल आहे. रविवारी उमा भारती भेलच्या बरखेडी येथील दारुच्या दुकानात घुसल्या आणि दगडफेक करत दारुच्या बाटल्या फोडल्या आहेत. तसेच राज्य सरकारला ७ दिवसांत दारुचे दुकाने बंद करण्याचा इशारा दिला आहे.

माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी म्हटलं होते की, दारुबंदी अभियानात कोणत्याही दुकानाच्या समोर जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर रविवारी उमा भारती यांनी बरखेडी येथील दारुच्या दुकानावर आपल्या समर्थकांसह पोहचल्या आणि दगडफेक केली.

- Advertisement -

उमा भारती दारुच्या दुकानात घुसत हातातील दगडाने दारुच्या बाटल्या फोडल्या आहेत. तर कार्यकर्त्यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काँग्रेसने निशाणा साधत म्हटलं आहे की, ७ राज्यांमध्ये विजयी झाल्यानंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी सुरु झाली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उमा भारती यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यांनी उमा भारतींना राज्य सरकारच्या दारुमुक्ती अभियानात सहभागी होण्यासाठी विनंती केली होती.

महिलांची छेड काढली जाते – उमा भारती

उमा भारती यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, इथे मजुरांची कॉलनी आहे. जवळ मंदिर आणि लहान मुलांची शाळा आहे. जेव्हा महिला किंवा मुली घराच्या छतावर उभे असतात तेव्हा दारु पिणारे त्यांच्या दिशेने उभे राहून लघुशंका करता आणि महिलांची छेड काढतात. मजुरांची सर्व कमाई या दुकानांमध्ये खर्च होते. येथील महिलांनी दारुबंदीसाठी आंदोलन केले कारण सरकारच्या धोरणांच्या विरोधात दुकान आहे. यासाठी राज्य सरकारने दुकान बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु गेल्या अनेक वर्षांपासून असे झाले नाही. मात्र ७ दिवसांत दुकान बंद झाले पाहिजे अशी मागणी केली असल्याचे उमा भारती म्हणाल्या.

काँग्रेसचा उमा भारतींवर निशाणा

- Advertisement -

काँग्रेस प्रवक्ते केके मिश्रा यांनी निशाणा साधताना म्हटलं आहे की, ५ राज्यांमध्ये भाजपला विजय मिळाल्यामुळे मध्य प्रदेशात सत्ता संग्राम सुरु झाला आहे. एकाने झाडू घेऊन सफाई केली, उमा भारतींचे दारुच्या दुकानावर दगडफेक आंदोलन परंतु दारु विकणाऱ्यांवर नाही तर विक्री करणाऱ्यांवर हल्ला करा असा निशाणा काँग्रेसने साधला आहे.


हेही वाचा : काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी परिवाराबाहेर? ‘या’ नेत्याच्या नावाची शिफारस

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -