घरदेश-विदेशभारताच्या जलसंकटावर संयुक्त राष्ट्राचा महत्त्वाचा अहवाल; 2050 पर्यंत देशात पाणीबाणीची शक्यता

भारताच्या जलसंकटावर संयुक्त राष्ट्राचा महत्त्वाचा अहवाल; 2050 पर्यंत देशात पाणीबाणीची शक्यता

Subscribe

नवी दिल्ली : 2050 पर्यंत भारताला जगातील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागणार असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. पाकिस्तान आणि चीन या शेजारी राष्ट्रांमध्येही परिस्थिती बिघडणार असून अनेक नद्यांमधील प्रवाहाची स्थितीही कमकुवत होणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जगातील 1.7 ते 2.40 अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अहवालानुसार 2016 मध्ये 9.33 कोटी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागत होता. युनायटेड नेशन्स वॉटर कॉन्फरन्स 2023 पूर्वी संयुक्त राष्ट्रांनी ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर रिपोर्ट 2023’ जारी केला आहे.

- Advertisement -

अहवालात करण्यात आलेले दावे?
1. आशिया खंडातील सुमारे 80 टक्के लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे.
2. हे संकट ईशान्य चीन, भारत आणि पाकिस्तानवर सर्वाधिक आहे.
3. या संकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असा अंदाज आहे.
4. हिमनद्या वितळल्यामुळे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख हिमालयातील नद्यांचा प्रवाह कमी होईल.

हेही वाचा – ‘बिरबलाची खिचडी’ ची चूल मांडत विरोधकांनी केला सरकारचा निषेध

- Advertisement -

२६ टक्के लोकांना अशुद्ध पाणी
जगातील २६ टक्के लोकसंख्येला पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला असून 46 टक्के लोक पिण्याच्या पाण्याचा लाभ घेत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या वतीने युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील दोन ते तीन अब्ज लोक वर्षातून किमान एक महिना पाणीटंचाईशी झगडतात. आगामी काळात हे संकट आणखी वाढणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

युनेस्कोचे महासंचालक काय म्हणाले?
युनेस्कोचे महासंचालक आंद्रे अझौले म्हणाले की, या जागतिक संकटातून बाहेर पडण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचे मुख्य संपादक म्हणाले की, ‘पाणी हे मानवतेसाठी रक्तासारखे असून जीवन, आरोग्य आणि लोकांच्या विकासासाठी आवश्यक आहे. वेळ आपल्या बाजूने नाही, त्यामुळे पाणी वाचवण्यासाठी खूप काही करायचे आहे. एकत्र येऊन कृती करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे या अहवालावरून दिसून येते. त्यामुळे बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -