घरताज्या घडामोडीरणदीप हुडाला संयुक्त राष्ट्राच्या एम्बेसेडर पदावरून हटवले, मायावतींवर टिप्पणी पडली महाग

रणदीप हुडाला संयुक्त राष्ट्राच्या एम्बेसेडर पदावरून हटवले, मायावतींवर टिप्पणी पडली महाग

Subscribe

बॉलिवुड अभिनेता रणदीप हुडाने मायातीवर यांच्यावर केलेल्या टिप्पणी त्याला चांगलीच महागडी ठरत आहे. पर्यावरणाच्या निमित्ताने झालेल्या करारासाठी Convention for the Conservation of Migratory Species of Wild Animals (CMS) आता एम्बेसेडर पदावरून त्याला हटविण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सचिवालयामार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रणदीप हुडाचा जातीयवादी अशा स्वरूपाची टिप्पणी करणारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी म्हणजे २०१२ रणदीप हुडाने एक मुलाखतीत उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याविरोधात केलेली टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आम्हाला या व्हिडिओबाबत माहिती नाही. व्हिडिओतील कमेंट्स या अतिशय आक्षेपार्ह अशा आहेत. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राच्या मूल्यांमध्ये असे प्रकार मोडत नाहीत. संयुक्त राष्ट्राला या २०१२ च्या व्हिडिओबाबत कोणतीही माहिती नव्हती. रणदीप हुडाला सीएमएसच्या एम्बेसेडर पदावर फेब्रुवारी २०२० मध्ये नेमण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रणदीप हुडा फक्त सीएमएस साठीच ब्रॅण्ड एम्बेसेडेर होता. रणदीप हुडाची नेमणुक ही ऑस्ट्रेलियन पर्यावरणवादी सॅचा डेंचसोबत तसेच ब्रिटीश बायोलॉजिस्ट इएन रेडमंड यांच्यासोबत करण्यात आली होती. रणदीप हुडा २०२३ पर्यंत ब्रॅण्ड एम्बेसेडेर म्हणून नेमण्यात आले होते.

- Advertisement -

ट्विटरवर मंगळवारपासून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रणदीप हुडाच्या या कमेंटला अनेक राजकीय पक्षांकडूनही जातीयवादी टिप्पणी केल्यासाठीचा म्हणून उल्लेख केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप घेत ही कमेंट जातीयवादी असल्याचे सांगितले. तसेच रणदीप हुडाने या प्रकरणात माफी मागावी आणि त्याला अटक व्हावी अशी मागणीही सोशल मिडियावर करण्यात आली. #ArrestRandeepHooda असा ट्रेंडही ट्विटरवर सुरू झाला होता. पण या संपुर्ण प्रकरणात रणदीप हुडाने मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -