घरदेश-विदेशChinese Rocket Landing: हिंदी महासागरातील मालदीव-श्रीलंकेजवळ चीनी रॉकेट कोसळले

Chinese Rocket Landing: हिंदी महासागरातील मालदीव-श्रीलंकेजवळ चीनी रॉकेट कोसळले

Subscribe

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनने चीनचं Long March 5B Yao-2 रॉकेट पृथ्वीवर आदळण्याचा इशारा दिला होता, अखेर आज हिंदी महासागरात ते कोसळले. चिनी माध्यमांच्या मते, हे रॉकेट भारतातील दक्षिण-पूर्वेकडे श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास कुठेतरी पाण्यात पडले आहे. अमेरिका स्पेस फोर्सच्या आकडेवारीनुसार, हे रॉकेट ताशी १८ हजार मैलांच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने जात होते, त्यामुळे ते कोठे उतरेल हे सांगता आले नाही. मात्र हे रॉकेट कोसळल्याने कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

या चीनी रॉकेटचे चार वेगवेगळे भाग अपेक्षित होते त्यातील तीन पाण्यावर आणि एक जमिनीवर आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च ५-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून १७० ते ३७२ किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल २५ हजार ४९० किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला ७.२१ किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते. २०२१-०३५ बी नावाचे हे रॉकेट १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद होते. वायुमंडलमध्ये प्रवेश करताच त्याचा एक मोठा भाग जळून खाक झाला आणि उर्वरित पाण्यात कोसळला.

वर्तवलेल्या शक्यतेनुसार, हे चीनी रॉकेट दक्षिणपूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलिया या भागात कोसळणार असल्याचे अपेक्षित होते. दरम्यान, पृथ्वीवर बहुतांश भाग हा पाण्याने व्यापला असल्याने हे रॉकेट जमिनीवर कोसळल्यास माणसांचे नुकसान होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता. यापूर्वी बीजिंग, मॅड्रिड किंवा न्यूयॉर्कमध्ये पडण्याची भीती होती परंतु जास्त वेगात असलेले हे रॉकेट कुठे लँडिंग होईल, ती जागा निश्चित करणं कठिण होते.

- Advertisement -

असे सांगितले गेले की, रॉकेटचे नियंत्रण सुटल्यानंतर रॉकेट पृथ्वीच्या दिशेने जाऊ लागले आणि पृथ्वीवर कोसळल्यानंतकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या जवळ येताच या चिनी रॉकेटचा मोठा भाग जळून खाक होईल. या रॉकेटच्या सहाय्याने चीनने आपल्या स्पेस स्टेशनचा पहिला भाग अवकाशात बांधण्यासाठी पाठविला होता. या मॉड्यूलचे नाव तियान्हे (Tianhe) ठेवण्यात आले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -