चालत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; नियंत्रण सुटल्याने 6 जणांना चिरडले

चालत्या बसमध्ये बसचालका हृदयविकाराचा झटका येताच अनियंत्रित झालेल्या बसने 6 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये तब्बल 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे.

चालत्या बसमध्ये बसचालका हृदयविकाराचा झटका येताच अनियंत्रित झालेल्या बसने 6 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये तब्बल 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. बस चालकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (uncontrolled vehicle crushed several people on road due to heart attack bus driver dies on driving seat)

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरच्या दमोह नाका परिसरात 50 प्रवाशांना घेऊन चाललेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अनियंत्रित झालेली बस पुढे असलेल्या माणसांना आणि वाहनांना धडक देत थांबली. या घटनेनंतर त्या परिसरात उपस्थित असलेल्या लोकांना सुरुवातीला हा मेट्रो बसचालक मद्यधुंद आहे असे वाटले. पण जेव्हा लोकांना मेट्रो बसचालक बेशुद्धावस्थेत आढळला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. बस चालकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेट्रो बसने ई-रिक्षा, ऑटो रिक्षा आणि दुचाकी चालकांनाही धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेट्रो बस चालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, या अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – हिंदुत्ववादी सरकार बोलायचं आणि हिंदुंच्याच मंदिराची जमीन लाटायची असा दुटप्पीपणा भाजपच करू शकते; कॉंग्रेसचा आरोप