घरदेश-विदेशउत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला; आत अडकलेल्या 40 कामगारांना पाइपद्वारे ऑक्सिजन पुरवठा

उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला; आत अडकलेल्या 40 कामगारांना पाइपद्वारे ऑक्सिजन पुरवठा

Subscribe

उत्तरकाशी : जिल्ह्यातील निर्माणाधीन बोगद्यात अपघात झाल्याचे समोर आले आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळला असून त्यात कामगार अडकले आहेत. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना पाइपच्या साहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. (Underconstruction tunnel collapses in Uttarkashi Piped oxygen supply to 40 workers trapped inside)

हेही वाचा – पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा सीमेवर साजरी करणार दिवाळी: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना भेटणार

- Advertisement -

डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. कामगारांना वाचवण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांचे मतही घेतले जात आहे. सिल्क्यरा ते दंडलगाव या नवयुग कंपनीच्या बांधकामाधीन बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनही सतर्कतेच्या मार्गावर आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याला तडे गेल्याने सुमारे 40 कामगार अडकले आहेत. सिल्क्यराकडे 200 मीटर पुढे ढिगारा आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात काम करणारे सर्व मजूर 800 मीटर अंतरावर अडकले आहेत.

हेही वाचा – Gold, Silver Price today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं – चांदीचे दर घसरले?

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन पाइपद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून मदत आणि बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -