Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती गंभीर; दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती गंभीर; दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

Related Story

- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या समस्येमुळे छोटा राजनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी छोटा राजनला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यातून तो बरा देखील झाला होता. छोटा राजन बऱ्याच दिवसांपासून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद आहे. असे सांगितले जात आहे की, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मंगळवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्समध्ये डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.

- Advertisement -

गेल्या ७ मे रोजी कोरोनाच्या संसर्गावर मात केल्यानंतर छोटा राजन यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला होता. वयवर्ष ६१ असणाऱ्या छोटा राजनला २६ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन २२ एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. यानंतर २४ एप्रिलला त्याला दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर ६१ वर्षीय अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला पुन्हा तिहार तुरुंगात पाठवल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते.

छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. मात्र ही अफवा असल्याचे नंतर तिहार तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन यांच्या मृत्युची बातमी ही अफवा असल्याचे तिहार तुरुंगाकडून स्पष्ट करण्यात देखील आले होते.

कोण आहे छोटा राजन…

- Advertisement -

छोटा राजन ऊर्फ नाना, याचे नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये शत्रूत्व निर्माण झाले. छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचे काम सुरु केले. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय. छोटा राजन विरोधात १७ हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, २०१५ साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.


- Advertisement -