डॉनच्या सुपुत्रांमध्ये ‘आध्यात्मिकतेचा’ व्हायरस!

कदाचित पूर्वजांच्या कृत्यांची जाणीव असल्यामुळे, सगळं वैभव सोडून अध्यात्माचा पर्याय स्विकारण्याचा निर्णय या दोन्ही तरुणांनी घेतला असावा.

daud ibrahim
प्रातिनिधिक फोटो

मुंबईवर अधिराज्य गाजवण्यासाठी आणि काळ्या कमाईसाठी रक्तरंजित गुन्हेगारीचा इतिहास घडविणारे, अंडरवर्ल्ड डॉन- ‘दाऊद  इब्राहिम’ आणि ‘छोटा शकील’ यांच्या सुपुत्रांना आध्यात्मिकतेच्या व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसमुळे धडाडीने टोळीयुद्ध करणाऱ्या डॉनची हवाच निघाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताचे एवढे मोठे साम्राज्य सोपवायचे कुणाकडे या विवंचनेत दोन्ही डॉन अडकले आहेत. दाऊदच्या मोठ्या मुलाने मौलवी बनण्यात धन्यता मानली आहे. तर छोटा शकीलच्या एकुलत्या एक मुलाने कुराण पठणात रस दाखविला आहे. भावाच्या दबदब्यावर अनेक वर्ष बिनदिक्कत खंडणी उकळणाऱ्या दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या केसमध्ये अटक झाली होती. सध्या तो ठाणे कारागृहात मोक्का अंतर्गत बंदिस्त आहे. तर दाऊदचा मुलगा हा अध्यात्मिक शिक्षण घेऊन प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इजेत्तमामध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान आपला मुलगा मौलवी झाल्याने काही दिवस दाउद हा नैराश्येत गेला होता. आता छोटा शकीलवरही तिच वेळ आली आहे. त्याचा मुलगा हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण पठणात अव्वल असून तोही अध्यात्माकडे वळला आहे. दाऊद आणि छोटा शकील हे बॉम्बस्फोटांनंतर पाकिस्तानच्या आश्रयाला गेले आणि तिथेच स्थायिक झाले आहेत.

गुन्हेगारीचा वारसदार कोण?

खरंतर दाउदच्या कुटुंबात अनेक मुले आहेत पण अंडरवर्ल्ड सांभाळण्यासाठी त्यापैकी एकही जण पात्र नाही. तर छोटा शकील याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्याचा एकुलत्या एक मुलाने पूर्वजांचा रक्तरंजित प्रवास खंडित करत पाकिस्तानमध्ये मौलवी बनण्याचा निर्णय घेतला. कुराण पठणामध्ये तो अव्वल असल्याचे समजते. त्याचे संपूर्ण कुराण तोंडपाठ असून गुन्हेगारी विश्वात त्याला रस नाही. सूत्रांनुसार, छोट्या शकीलच्या दोन्ही मुली विवाहित असून त्यांचे पती कराचीमध्ये डॉक्टर आहेत. दरम्यान छोटा शकीलचे आता वय झाले असून ‘कानून के हाथ लंबे है’, म्हणत तो पाकिस्तनच्या कराची शहरात बसून आपले साम्राज्य सांभाळतो आहे. थोडक्यात ‘गुन्हेगारी साम्राज्यातला आपला उत्तराधिकारी कोण?’ हा प्रश्न चिन्ह दाउद आणि छोटा शकील या दोघांनाही सतावत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील तरुण मुलगा हा अध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो हे जरा विलाक्षणच आहे. कदाचित पूर्वजांच्या कृत्यांची जाणीव असल्यामुळे सगळं वैभव सोडून अध्यात्माचा पर्याय स्विकारण्याचा निर्णय या दोन्ही तरुणांनी घेतला असावा. या मागचे कारण असे कि, अध्यात्मिक वाटचालीने दाउद आणि छोटा शकील याच्या सात पिढीला जन्नत मिळावी चिरशांती मिळावी म्हणून या शेत्राकडे हि दोन तरुण मुले वळल्याचे चित्र दिसत आहे. छोटा शकीलचा मुलगा हा कुराण आणि कुराणाच्या आयती या तोंडपाठ असल्याने त्याचीही वाटचाल अध्यात्मिकतेकडे सुरु झाली आहे. दाउद आणि छोटा शकील यांची कारकीर्द पाहता भारतात त्यांना भगोडे जरी म्हणत असले तरीही त्याची मुले मात्र पाकिस्तानात कराचीत उद्या मोठे प्रस्थ असलेले धर्मगुरू होतील असेच चित्र दिसत आहे