Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Drugs Case: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला NCBकडून अटक

Drugs Case: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला NCBकडून अटक

Related Story

- Advertisement -

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईच्या एनसीबीकडून आज, बुधवारी अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. माहितीनुसार पंजाबहून दुचाकीवरून ड्रग्ज आणताना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

नुकतेच एनसीबीने चरसचे दोन कंसाइनमेंट पकडले होते, जे पंजाबचे लोकं काश्मीरहून मुंबईला दुचाकीवरून आणत होते. याप्रकरणात जवळपास २५ किलोग्रॅम चरस जप्त केले गेले होते. याच प्रकरणातील पुढील तपासादरम्यान एनसीबीला अंडरवर्ल्डचे धागेदोरे मिळाले. यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीने अटक केली आहे. काही वेळातच इक्बालला एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले जाईल. दरम्यान याप्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीला टेरर फंडिंग आणि ड्रग्ज पुरवठासाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनसंबंधित जोडलेले महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. याच आधारावर एनसीबीने मुंबईतील काही जागांवर छापेमारी केली होती. अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि चरस पुरवठा करण्याचे कनेक्शन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडून सापडले आहे आणि त्याच्या आधारे एनसीबीने ठाणे कारागृहात बंद असलेल्या इक्बाल कासकरचा रिमांड घेतला आहे.

- Advertisement -