घरदेश-विदेशअंडरवर्ल्ड डॉन दाऊद पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत; NIA चा मोठा खुलासा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत; NIA चा मोठा खुलासा

Subscribe

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, रशीद मारफानी उर्फ ​​रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम करत होता, जेणेकरून  गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे दुबईतून भारतात पाठवायचे.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने टेरर फंडिंग प्रकरणी त्यांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा केला आहे. दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, दाऊदने पाकिस्तानातून 25 लाख रुपये दुबईत हवालाद्वारे सुरत आणि त्यानंतर मुंबईत पाठवले आहेत. ही रक्कम आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना पाठवण्यात आली आहेत. अशाप्रकारे दोघांनी मागील चार वर्षांत हवालाद्वारे 12 ते 13 कोटी रुपये पाठवले आहेत. साक्षीदार हा सुरतस्थित हवाला ऑपरेटर असून त्याची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान असे समोर आले आहे की, रशीद मारफानी उर्फ ​​रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम करत होता, जेणेकरून  गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे दुबईतून भारतात पाठवायचे.

आरोपपत्रात दाऊद, शकील व्यतिरिक्त इतरही नावे आहेत
आरोपपत्रात दाऊद, शकील, त्याचा मेहुणा सलीम फल, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांची नावे आहेत. या तिघांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून 25 लाख रुपये भारतात कसे पाठवले गेले. एनआयएने दावा केल्याप्रमाणे, शब्बीरने 5 लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. 9 मे 2022 रोजी शब्बीरच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

- Advertisement -

अनेक शहरे डी कंपनीच्या निशाण्यावर 
डी-कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एनआयएच्या आरोपपत्रानुसार, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) देशातील मोठ्या राजकारणी आणि अनेक मोठ्या व्यक्तींनी लक्ष्य केले आहे. एवढेच नाही तर भारतातील विविध शहरांमध्ये दंगल घडवण्यासाठी दाऊदने डी कंपनीला मोठी रक्कमही पाठवली होती. त्यामध्ये भारताची राजधानी दिल्ली (delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबई (mumbai) यादीत अग्रस्थानी होते.


हे ही वाचा –  काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करा; कोर्टाचे आदेश

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -