घरताज्या घडामोडीUnemployment in India: देशात बेरोजगारीची लाट, ५ कोटींहून अधिक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Unemployment in India: देशात बेरोजगारीची लाट, ५ कोटींहून अधिक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Subscribe

भारतासारख्या विकसनशील देशात लोकसंख्या आणि बेरोजगारी हे एक मोठं आव्हान आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका रिपोर्टनुसार, देशात ५ कोटींहून अधिक तरूणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगारांची संख्या ५.३ कोटी इतकी झाली. यामध्ये महिलांची संख्या १.७ कोटी आहे. तर घरात बसणाऱ्या आणि कामं शोधण्यात मग्न असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. देशातील बेरोजगाराचा आकडा वाढत असल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

बेरोजगारीमध्ये ५३ टक्के महिलांचा समावेश

५.३ कोटी बेरोजगारी असलेल्या नागरिकांमधून ३.५ कोटी लोकं सतत काम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळपास ८० लाख महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे. १.७ कोटी बेरोजगार सध्या काम करत आहेत. बेरोजगारीमध्ये ५३ टक्के महिला म्हणजेच ९० लाख महिलांचा समावेश आहे. भारतात रोजगार मिळण्याचा दर प्रचंड कमी असल्याची माहिती सीएमआयईकडून देण्यात आली आहे.

६० टक्के लोकांना रोजगार देणं महत्त्वाचं

भारतात फक्त ४३ टक्के लोकांना रोजगार मिळण्यात यश मिळालं आहे. तसेच भारतात ३८ टक्के लोकांना रोजगार मिळत आहे. २०२० सालानंतर जगभरातून केवळ ५५ टक्के लोकांना रोजगार मिळाला होता. भारताची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी ६० टक्के लोकांना रोजगार देणं फार महत्त्वाचं आहे. महिलांना रोजगार कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगार वाढवण्यासाठी अनेक उपाय करणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जातंय.

- Advertisement -

हेही वाचा : Corona Positive: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -