घर देश-विदेश Unemployment Rate : जगात बेरोजगारांची संख्या वाढतेय, भारताची परिस्थिती पाकिस्तानपेक्षाही वाईट

Unemployment Rate : जगात बेरोजगारांची संख्या वाढतेय, भारताची परिस्थिती पाकिस्तानपेक्षाही वाईट

Subscribe

कोरोनानंतर भारतासह संपूर्ण जगात महागाई आणि त्यासोबतच इतर गोष्टींच्या समस्या निर्माण झाली आहे. महागाईनंतर सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारीची. याबाबतचा एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे.

मुंबई : कोरोनानंतर भारतासह संपूर्ण जगात महागाई आणि त्यासोबतच इतर गोष्टींच्या समस्या निर्माण झाली आहे. महागाईनंतर सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारीची. जगातील अनेक देशांमधील अर्थव्यवस्था या अत्यंत संथ झाल्याअसून याचा परिणाम महागाईवर दिसून येत आहे. संपूर्ण जगावर सध्या मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. कोरोनाशिवाय रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा देखील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. परंतु आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार बेरोजगारीच्या समस्येने डोके वर काढले असून जगातील अनेक देशांमध्ये बेरोजगारांची संख्या वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. (Unemployment Rate: The number of unemployed in the world is increasing, India’s situation is worse than Pakistan)

हेही वाचा – WHO Alert : भारतात विकली जात आहेत लिव्हरची बनावट औषधं; नावं तपासून घेण्याचा सूचना

- Advertisement -

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सकडून नुकतेच जगात कोणत्या देशात किती टक्के बेरोजगार आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली. यामध्ये सर्वाधित बेरोजगार हे दक्षिण आफ्रिका देशात असल्याची माहिती समोर आली असून या देशात बेरोजगारीचा दर हा 32.6 टक्के इतका आहे. तर बेरोजगारीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इराक या देशाचा क्रमांक असून इराकमध्ये बेरोजगारीचा दर 15.55 टक्के इतका आहे. बेरोजगारीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बोस्निया आणि हर्जेगोविना हे देश असून येथे बेरोजगारीचा दर 13.3 टक्के आहे. या यादीत अफगाणिस्तान चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर आहे. या देशाचा बेरोजगारीचा दर हा अनुक्रमे 13.3 टक्के आणि 11.6 टक्के आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सकडून देण्यात आलेल्या अहवालातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून त्या माहितीनुसार, भारतामध्ये बेरोजगारांची संख्या ही पाकिस्तानपेक्षाही अधिक आहे. भारतामध्ये बेरोजगारीचा दर हा 8 टक्के आहे, तर पाकिस्तानमध्ये बेरोजगाराचा दर हा 6.3 टक्के आहे. पण लोकसंख्येच्या दृष्टीने जर का या बेरोजगारीबाबतचा विचार केला तर भारताची लोकसंख्या पाकिस्तानच्या तुलनेत 7 ते 8 पट अधिक आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने पाकिस्तानचा बेरोजगारी दर हा अधिकच आहे.

- Advertisement -

तर, भारताचा शेजारील देश असलेल्या चीनमध्ये बेरोजगारीचा दर हा 5.3 टक्के आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशाशी जर का चीनच्या बेरोजगारीच्या दराची तुलना केली तर चीनमध्ये बेरोजगारीचा दर हा अधिक आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर हा 3.8 टक्के असून ऑस्ट्रेलियामध्ये 3.7 टक्के नागरिक हे बेरोजगार असल्याची माहिती या अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. तर कतारमध्ये केवळ 0.1 टक्के बेरोजगारीचा दर असून सर्वात कमी बेरोजगार याच देशात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

- Advertisment -