घरअर्थजगतटॅक्सी व्यवसायातील संबंधित कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांचा रोजगार जाण्याची शक्यता, 500 कर्मचाऱ्यांना कामावरून...

टॅक्सी व्यवसायातील संबंधित कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांचा रोजगार जाण्याची शक्यता, 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते कंपनी

Subscribe

नवी दिल्ली – टॅक्सी व्यवसायातील ओला कंपनीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मिडिया रोपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी कपातीचा परिणाम ओला कंपनीवर पहायला मिळणार आहे. कंपनीआपल्या सॉफ्टवेअर टीममध्ये काम करणाऱ्या 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, असे म्हटले जात आहे.

कर्मचारी कपातीमागचे मुख्य कारण काही काळापूर्वी लॉन्च झालेल्या Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची घसरलेली विक्री असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या मते Ola आपल्या सॉफ्टवेअर टीममधून सुमारे 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

कंपनीचे काय म्हणणे आहे –

ओला इलेक्ट्रिक ही भारतातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी आहे. कंपनीचे लक्ष विक्री, वाहन, बॅटरी ऑटोमेशन, उत्पादन आणि स्वायत्त अभियांत्रिकी यासारख्या गोष्टींवर आहे. याशिवाय कंपनी नॉन-सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग डोमेनवरही लक्ष केंद्रित करत आहे, असे ओलाचे प्रवक्ते म्हणाले.

- Advertisement -

अनेक बड्या लोकांनी सोडली कंपनी –


कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील अनेक उच्च-स्तरीय अधिकारी गेल्या दोन वर्षांत कंपनीला रामराम ठोकला आहे. काही काळापूर्वी कंपनीने त्याच्या पूर्व-मालकीच्या कार व्यवसाय ओला कार्स आणि कंपनीच्या द्रुत वाणिज्य व्यवसाय ओला डॅशमधून सुमारे 2,000 कर्मचारी काढून टाकले होते. सुरवातीला अत्यंत तेजीने स्पर्धकांना मागे टाकणाऱ्या ओला कंपनीला इलेक्ट्रिक बाईक क्षेत्र फारसे यश दिसत नसल्याचे चित्र आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -