घरताज्या घडामोडीUNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत धोलाविरा शहराचा समावेश

UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत धोलाविरा शहराचा समावेश

Subscribe

सामान्य युगाच्या आधीच शहराची निर्मिती

UNESCO च्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या बैठकीत भारताकडून गुजरातच्या हडप्पाकालीन धोलाविरा शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (World Heritage Site (WHS) समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोमार्फत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच इराण, जपान, जॉर्डन, फ्रान्स यादेशातील स्थळांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याआधीच तेलंगणाच्या रूद्रेश्वर मंदिराचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. हे मंदिर १३ व्या शतकातील असल्याचा इतिहास आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये आताच्या घडीला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत तीन स्थळांचा समावेश आहे. त्यामध्ये पावागडच्या चंपानेर, पाटनच्या रानी का वावचा आणि अहमदाबाद शहराचा समावेश आहे. त्यामध्ये धोलाविराची भर पडली आहे. आतापर्यंत कोणत्याच हडप्पाकालीन शहराचा समावेश हा जागतिक वारसा यादीत करण्यात आला नव्हता. अशा प्रकारचा दर्जा मिळणारे हे पहिलेच शहर आहे. या शहराच्या समावेशासोबतच भारतातून एकुण ४० स्थळांना यादीत स्थान मिळाले आहे.

गुजरातचे धोलाविरा हे शहर सर्वात चांगल्या प्रकारे जतन केलेले असे शहर आहे. सामान्य युगाच्याही आधी निर्माण करण्यात आलेल्या शहरापैकी एक असे ३ बीसी च्या दरम्यान विकसित झालेले असे शहर आहे. हे शहराचा शोध हा १९६८ साली लागला. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम अशी पाणी व्यवस्थापन पद्धती, सुरक्षेसाठी मल्टीलेअर अशी सुरक्षा व्यवस्था, बांधकामात झालेला दगडाचा चांगला वापर आणि काही वैशिष्ट्यपुर्ण अशी रचना ही बांधकामाचे वैशिष्ट्ये होय. या शहरासोबतच कलेचीही जोड आहे. या शहरात तांबे, हिऱ्यांचा वापर, सोने, मौल्यवान अशा धातूंचा समावेश या साईटवर करण्यात आला आहे. त्यासोबतच धोलाविरा येथे आंतरराज्य व्यापाराची कनेक्टिव्हिटीही यासारखी वैशिष्ट्ये ही शहरासोबतच जोडली गेली होती.

- Advertisement -

काय असतात निकष ?

युनेस्को एखाद्या ठिकाणाची निवड करताना त्या ठिकाणाला कितपत जतन करण्यात आले आहे ? ते स्थळ किती सुरक्षित आहे ? यासारख्या निकषांची पूर्तता युनेस्कोच्या माध्यमातून तपासण्यात येते. सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा स्वरूपाचा वारसा हा मानवतेसाठी कितपत उपयुक्त आहे या गोष्टीचीही पडताळणी करण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या कराराअंतर्गत आणि युनेस्कोने स्विकारलेल्या १९७२ कराराच्या आधारीत निकषांवरच एखाद्या स्थळाचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होतो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -