Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भारतासाठी अविस्मरणीय क्षण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतासाठी अविस्मरणीय क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

मुंबई : चांद्रयान 3 ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. यानतंर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश झाला आहे. भारताने चंद्रावर लँडिंग करून इतिहास रचला आहे. चांद्रयान -3 च्या यशस्वी मोहिमेनंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या चांद्रयान – 3 च्या यशाने देशाला नवी चेतना देणार क्षण आहे.

भारताच्या चांद्रयान – 3 यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ” आज भारतासाठी अविस्मरणीय क्षण असून हा क्षण भारताच्या इतिहाससाठी नव्या भारताचा जयघोषाच आहे. आज 140 कोटी लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आजचा हा क्षण भारतात नवा विश्वास, ऊर्जा आणि चेतना देणार आहे.”

- Advertisement -

पंतप्रधान म्हणाले,  “भारत हा दक्षिण ध्रुवार पोहोचणार पाहिला देश आहे. आपल्या देशात जमिनीला आई आणि चंद्राला मामा म्हणतो. ‘चंदा मामा दूर के हैं’, असे म्हटले जाते होते. पण आता असा एक दिवस येईल, चांदो मामा फक्त एक पाऊल दूर आहे”, अशी पुढची पिढी म्हणतील.

- Advertisement -

हेही वाचा – चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

पंतप्रधानांनी ब्रिक्समधून देशाला केले संबोधित

पंतप्रधान हे ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आहे. पंतप्रधान मोदी हे दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान – 3 मोहिमेत व्हर्चुअल उपस्थितीl राहिले होते आणि चांद्रयान – 3 यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत इस्रोच्या सगळ्या वैज्ञानिकांचे कौतुक केले.

हेही वाचा – Chandrayaan-3: इस्रोने जारी केली चांद्रयान-३ मिशनच्या कमांड सेंटरची छायाचित्रं

अशी झाली सॉफ्ट लॅंडिंग

चांद्रयान-3 चे लँडिंग (चंद्रावरील वेळेनुसार) पहाटे 5.30 वाजता सुरू झाले. रफ लँडिंग खूप यशस्वी झाली. यानंतर लँडरने पहाटे 5.44 वाजता उभी लँडिंग केली. तेव्हा चंद्रापासून चांद्रयान-3 चे अंतर 3 किमी होते. चांद्रयान-3 ने आपल्या 20 मिनिटांत चंद्राच्या शेवटच्या कक्षेतून 25 किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

 

- Advertisment -