घरताज्या घडामोडीमाझ्या फोटोचे मिम्स झाले तर आनंदच - नरेंद्र मोदी

माझ्या फोटोचे मिम्स झाले तर आनंदच – नरेंद्र मोदी

Subscribe

आज ५८ वर्षांनंतर भारतात कंकणाकृती सुर्यग्रहण बघण्याचा योग आला. मात्र भारतातील अनेक भागांमध्ये धुके आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे या सुर्यग्रहणाचा आनंद अनेकांना घेता आला नाही. सामान्य माणसांप्रमाणेच नरेंद्र मोदींना देखील ढगामुळे सुर्यग्रहण पाहता आलेले नाही. मोदींनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“सामान्य नागरिकांप्रमाणे मी देखील सुर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. मात्र दुर्दैवाने ढगाळ वातावरणामुळे मला सुर्यग्रहण पाहता आले नाही. मात्र कोझीकोडी आणि इतर भागातील सुर्यग्रहणाचे चित्र मी लाईव्ह पाहू शकलो. तसेच सुर्यग्रहणाच्या बाबतीत तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यामुळे माझ्या माहितीमध्ये भर पडली”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी या ट्विटसोबत काही फोटो शेअर केले होते. यातीलच एक फोटो ट्विट करत एका युजरने म्हटले की, या फोटोवर आता मिम्स बनतील. यावर मोदींनी देखील तात्काळ रिप्लाय दिला आहे. माझ्या फोटोचे मिम्स होत असेल तर आनंदच आहे, अशा आशयाचा मजकूर मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे ट्रोलर्सना एकप्रकारे मोदींनी खिलाडू वृत्तीने उत्तर दिल्याचे पहिल्यांदाच दिसत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांचे हे ट्विट ट्विटरवर झपाट्याने व्हायरल होत असून पहिल्या ट्विटपेक्षाही जास्त चर्चा या दुसऱ्या ट्विटची झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -