घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरच्या कर्नाहमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, एकाला कंठस्नान; सुरक्षा दलाची कारवाई

जम्मू-काश्मीरच्या कर्नाहमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, एकाला कंठस्नान; सुरक्षा दलाची कारवाई

Subscribe

कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमधील कर्नाह येथे सुरक्षा दलांनी एका अज्ञात घुसखोराला ठार केले आहे.

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमधील कर्नाह येथे सुरक्षा दलांनी एका अज्ञात घुसखोराला ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात 24 मार्च रोजी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न करताना सुरक्षा दलांनी एका अज्ञात घुसखोराला ठार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमधील कर्नाह येथे सुरक्षा दलांनी एका अज्ञात घुसखोराला ठार केले आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळच्या सुमारास कर्नाह भागातील जब्दी येथे नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने त्यादिशेने शोधमोहिम राबवली. त्यानंतर झालेल्या चकमकीत एक घुसखोर मारला गेला. अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे, घटनास्थळावरून एक AK-47 रायफल आणि काही दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

( हेही वाचा: ‘या’ राज्यात कोरोनाच्या XBB.1.16 या सबव्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे; राज्याची स्थिती काय? )

- Advertisement -

सोपोरमध्ये शस्त्रास्त्रांसह एका दहशतवाद्याला अटक

याआधी गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका सहाय्यकाला अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. उमर बशीर भट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो सोपोर येथील मांज सीरचा रहिवासी आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या  सुत्रांंनी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पेठ सीर रेल्वे स्टेशनजवळ 52 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि CRPF च्या 177 बटालियनच्या जवानांसह संयुक्त शोध मोहीम राबवली. यावेळी एका संशयिताला पकडण्यात आले. त्याच्याकडून एक हँडग्रेनेड, एक पिस्तूल, एक पिस्तुलाचे मॅगझीन, 15 पिस्तुल राउंड आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध तारजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

( हेही वाचा: पुतीन यांना अटक झाली तर जगावर होईल बॉम्बहल्ला; रशियाची जगाला थेट धमकी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -