घरअर्थजगतUnion Budget 2021: अर्थसंकल्पाला शेअर बाजाराची सलामी; सेन्सेक्स १६५० अंकांनी वधारला

Union Budget 2021: अर्थसंकल्पाला शेअर बाजाराची सलामी; सेन्सेक्स १६५० अंकांनी वधारला

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला (Union Budget 2021) शेअर बाजाराने सलामी दिली आहे. अर्थसंकल्पाचं स्वागत करत सेन्सेक्स १६५० अंकांनी वधारला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२०० वर पोहोचला असून निफ्टीनेही ३५० अंकांची वाढ नोंदविली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सेन्सेक्स १६५० अंकांनी व निफ्टी ४७० अंकांनी वधारला. दोन सरकारी बँकांची निर्गुंतवणूक, एलआयसीचा आयपीओ आणि बँकांच्या नव्या भांडवलाशी संबंधित अर्थसंकल्पीय घोषणांमुळे बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ झाली आहे.

निफ्टीमध्ये सुमारे ५०० अंकांची वाढ

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. कोरोना कालावधीनंतर अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या घोषणेमुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ४५९.३० अंकांनी वाढून १४,०९३.९० वर व्यापार करीत आहे. त्याचप्रमाणे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही १६५० अंकांनी वधारला आणि ४८,००४.७१ अंकांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला.

- Advertisement -

कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ

सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे समभाग (शेअर) वधारले. त्याच वेळी निफ्टीही कमी-अधिक होती. ५० पैकी ४५ कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली.

इंडसइंड बँकेला सर्वाधिक फायदा

सेन्सेक्समधील इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. ११.१३ टक्क्यांवर पोहोचला. त्याचप्रमाणे निफ्टीमध्येही बँकेचा वाटा ११.४३ टक्के होता. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्समध्येही वाढ झाली.

- Advertisement -

हेही वाचा – Union Budget 2021: अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग; जाणून घ्या


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -