union budget 2021: निर्मला सीतारमण यांनी का नेसली लाल साडी?

union budget 2021; finance minister sitharaman dons red saree for her third budget presentation
union budget 2021: निर्मला सीतारमण यांनी का नेसली लाल साडी?

संपूर्ण २०२० वर्ष हे कोरोनाच्या काळात गेले. यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (union budget 2021) सादर झाला. आज सकाळी ११ वाजता २०२१-२२ या वर्षातील सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थसंकल्प सादर करताना नवीन बदल दिसून आले. पण आजच्या अर्थसंकल्प (Budget) अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या लाल रंगाच्या साडीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले. अनेकांना आता प्रश्न पडला आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल साडी (Nirmala Sitharaman dons red saree) का नेसली असावी? तर आज आपण तेच जाणून घेऊयात.

म्हणून घातली निर्मला सीतारमण यांनी लाल साडी

निर्मला सीतारमण यांना क्लासी हँडलूम आणि सिल्क साड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे त्यांनी आजच्या अधिवेशनात लाल आणि क्रीम रंगाची साडली नेसली होती आणि त्यावर सोन्याची चेन, बांगड्या, कानातले असा साधा लूक त्यांनी केला होता. याच साध्या लूकची चर्चा चांगलीच रंगली. दरम्यान प्रेम, ऊर्जा, शक्ती यांचे प्रतीक लाल रंग मानता जातो. त्यामुळे मंदावलेल्या अर्थवस्थेला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचे म्हटले जात आहे.

निर्मला सीतारमण यांनी ‘ही’ परंपरा मोडली

निर्मला सीतारमण यंदा चामड्याच्या ब्रीफकेसमधून बजेटची कागदपत्रे आणण्याऐवजी टॅबमधून सर्व कागदपत्रे आणली होती. पूर्वी पासून चामड्याच्या ब्रीफकेसमधून बजेटची कागदपत्र आणण्याची परंपरा निर्मला सीतारमण यांनी मोडित काढली. यापूर्वी त्यांनी वहीखाते घेऊन जाण्याची परंपरा सुरू केली होती. यावर्षी त्यांनी ऊर्जेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या कापडातून टॅब आणला होता. पहिल्यांदाच मेड इन इंडिया टॅबद्वारे पेपरलेस अर्थसंकल्प सादर झाला. तसेच यंदा बजेटचे प्रत्येक अपडेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘Union Budget Mobile App’ची निर्मिती केली. या Appच्या माध्यमातून लोकांना बजेट पाहणे आणि वाचणे शक्य झाले.


हेही वाचा – union budget 2021-अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या दृष्टीक्षेपातील बजेट