घरअर्थजगतUnion Budget 2021: २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य; नागपूर आणि नाशिक मेट्रोची...

Union Budget 2021: २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य; नागपूर आणि नाशिक मेट्रोची घोषणा

Subscribe

नागपूर मेट्रो फेज २ आणि नाशिक मेट्रो फेज १ ची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर करत आहेत. दरम्यान, सीतारमण यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नागपूर फेज २ आणि नाशिक फेज १ ची घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. (Announcement of Nagpur and Nashik Metro) दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याचं सांगितलं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यात त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या योजना आणि त्यासाठी केलेली आर्थिक तरतुद याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार करण्यात आली आहे. रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे व्यतिरिक्त मेट्रो, सिटी बस सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आता मेट्रो लाइट आणण्यावर भर देण्यात आला आहे, असं निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. कोची, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर, नाशिक येथे मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपुरात नागपुरात मेट्रो आली. याला सुरुवातीला विरोधकांकडून विरोध झाला. आता याच नागपूर मेट्रोसाठी सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ५,९७६ हजार कोटींची घोषणा करण्यात आली.


हेही वाचा – Union Budget 2021: यामुळे २८ ऐवजी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -