घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: जाणून घ्या अर्थसंकल्पाचा पूर्ण इतिहास आणि रोचक गोष्टी

Union Budget 2021: जाणून घ्या अर्थसंकल्पाचा पूर्ण इतिहास आणि रोचक गोष्टी

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ सादर केला. निर्मला सीतारमण यांनी वचन दिल्याप्रमाणे यंदाचे केंद्रीय अर्थसंकल्प विशेष ठरला. तसेच, कोरोना साथीने अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतरही हा पहिला अर्थसंकल्प होता. १६१ वर्षांच्या इतिहासासह भारतीय केंद्रीय अर्थसंकल्प हा जगातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मानला जातो आणि दरवर्षी अर्थ मंत्रालयाच्या संबंधित आर्थिक व्यवहार विभागाने तयार केला जातो. याच केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ बद्दल काही रोचक गोष्टी

पहिला अर्थसंकल्प

१८ फेब्रुवारी १८६० रोजी स्कॉसमॅन जेम्स विल्सन, व्हायसरायच्या कार्यकारी समितीचे वित्त सदस्य, यांनी भारताचे पहिले केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले होते. विल्सन हे इकॉनॉमिस्ट म्हणून तसेच चार्टर्ड बँकेचे संस्थापक म्हणूनही ओळखले जातात, जे नंतर १९६९ मध्ये स्टँडर्ड बँकेत विलीन झाले होते.

- Advertisement -

अर्थसंकल्पाची ब्रिफकेस

अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे २०१९ बजेट ब्रीफकेसची जुनी परंपरा मोडून डिजिटलकडे वळले. पूर्वी, बजेट ब्रीफकेस हा अर्थसंकल्प दिनाचा अविभाज्य भाग होता आणि ब्रिटनकडून मिळालेली परंपरा होती, जिथे याची सुरूवात अर्थसंकल्प प्रमुख विलियन ग्लेडस्टोन यांनी केली होती. त्यावेळी त्यांची भाषणे इतकी मोठी होती की त्यांचे सर्व कागदपत्रे सामावून घेण्यासाठी ब्रीफकेसची आवश्यकता होती.

काळा अर्थसंकल्प

१९७३-७४ चा अर्थसंकल्प तीव्र आर्थिक तणावाच्या वेळी सादर करण्यात आला होता, हा अर्थसंकल्प १९७१ च्या बांगलादेश युद्धा नंतर आला. ५५० कोटी रुपयांचे तोटा आणि सामान्य विमा कंपन्या आणि कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करण्याची योजना यामुळे काळ्या अर्थसंकल्प म्हटले जाते.

- Advertisement -

काळा अर्थसंकल्प

१९७३-७४ चा अर्थसंकल्प तीव्र आर्थिक तणावाच्या वेळी सादर करण्यात आला होता, हा अर्थसंकल्प १९७१ च्या बांगलादेश युद्धा नंतर आला. ५५० कोटी रुपयांचा तोटा आणि सामान्य विमा कंपन्या आणि कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करण्याची योजनेमुळे तेव्हाचा अर्थसंकल्प काळा अर्थसंकल्प म्हणून संबोधला गेला.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ

२००० पर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु नंतर २००१ मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी वेळ बदलला आणि तेव्हापासून सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जातो. माजी अर्थमंत्री मोराजी देसाई यांनी संसदेत १० केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले होता. जे पी. चिदंबरम यांनी ९ अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्र्यांनी सादर केलेली सर्वात मोठी संख्या आहे.

भाषा

१९५५ पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीमध्ये सादर करण्यात आला. दरम्यान, १९५६ मध्ये, कॉंग्रेसच्या सरकारने अर्थसंकल्पीय कागदपत्रे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत छापण्याचा निर्णय घेतला.

प्रथम महिला अर्थमंत्री

१९७० मध्ये भारतीय केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार्‍या पहिल्या महिला अर्थमंत्री इंदिरा गांधी होत्या.

पहिला पेपरलेस अर्थसंकल्प

केंद्राने एप्रिल आर्थिक वर्षाच्या (आर्थिक वर्ष २०२१-२२) सुरूवातीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे न छापण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खासदारांना अर्थसंकल्पाची आणि आर्थिक पाहणीची एक कॉपी मिळेल, ज्यात अर्थव्यवस्थेच्या सर्व तरतूदींची माहिती आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्पीय भाषण संपविल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे १ फेब्रुवारी २०२१ रोजी मोबाइल अॅपवर – “यूनिअन बजेट मोबाइल अॅप” वर उपलब्ध असणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -