घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: १५ वर्षे जुन्या वाहनांची होणार 'फिटनेस टेस्ट'

Union Budget 2021: १५ वर्षे जुन्या वाहनांची होणार ‘फिटनेस टेस्ट’

Subscribe

'स्क्रॅपिंग पॉलिसी'च्या निर्णयानुसार खासगी वाहनासह व्यावसायिक वाहनांची केली जाणार फिटनेस टेस्ट.

देशातील खासगी आणि व्यावसायिक वाहनांची आता फिटनेस टेस्ट केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. (Union Budget 2021) च्या अर्थसंकल्पात ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’चा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार खासगी वाहनांची २० वर्षानंतर फिटनेस टेस्ट केली जाणार आहे. तर व्यावसायिक वाहनांची १५ वर्षानंतर टेस्ट केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही टेस्ट करुन घेणे ऐच्छिक असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.

कुठे केली जाणार फिटनेस टेस्ट

वाहनचालकांना जर आपल्या वाहनाची फिटनेस टेस्ट करुन घ्यायची असल्यास त्यांना सरकारने ठरवून दिलेल्या सेंटरमध्ये जावे लागणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

- Advertisement -

यामुळे काय होणार?

वाहनांची फिटनेस टेस्ट केल्यामुळे त्याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे इंधनाची बचत, पर्यावरणाची हानी आणि प्रदूषण रोखले जाणार आहे. तसेच इंधनाच्या आयातीवरील खर्च देखील कमी होणार आहे.

जुनी वाहने भंगारात

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘जी वाहने १५ वर्षांपेक्षा जुनी आहेत, अशी वाहने भंगारात जाणार आहे’. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या योजनेचे म्हणजेच ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’चे संकेत दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Union Budget 2021 : जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटी


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -