घरदेश-विदेशUnion Budget 2021: अर्थसंकल्पामुळे कोरोना आव्हानाशी लढण्यास मदत - पंतप्रधान मोदी

Union Budget 2021: अर्थसंकल्पामुळे कोरोना आव्हानाशी लढण्यास मदत – पंतप्रधान मोदी

Subscribe

नागरिकांच्या फायद्याचे बजेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प २०२१ (Union Budget 2021) सादर केले. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी काही नव्या योजनांची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा बजेट भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूती देणारा आहे. नवीन क्षेत्रांना विकसित करणे आणि आधुनिकतेकडे पुढे जाणार आहे तसेच नव्या सुधारणा करत आहोत. आजच्या बजेमध्ये आत्मनिर्भरतेचे दर्शन झाले असेही मोदी म्हणाले आहेत. नागरिकांच्या फायद्याचे बजेट आहे. हा बजेट गुंतवणूक आणि उद्योग समूहात सकारात्मक बदल घडवतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आजच्या अर्थसंकल्पाचे सर्वांनी स्वागत केले आहे. तसेच हा बजेट आरोग्य अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. त्यामुळे आरोग्या क्षेत्रात गतीने बदलाव होणार आहे. केंद्र सरकारने बजेट पारदर्शक ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. तसेच देशात विकास घडवूण आणेल. यामध्ये लेह-लडाखसारख्या भागात विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

- Advertisement -

भारतातील कोस्टल भाग म्हणजेच कर्नाटक, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना व्यावसायिक राज्य बनवण्याचा दिशेने विकास करत आहे. या बजेटमध्ये संशोधनावर आधारित प्रगती करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. ज्या योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यातून भारतातील जवानांना बळ भेटेल आणि भारताची विकासाकडे वाटचाल होईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्प बजेटमध्ये शुद्ध जल संकल्पनेवरही लक्ष देण्यात आले आहे. महिलांचे जीवन सोपे करण्यासाठी त्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि पोषण यावर भर देण्यात आला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा महणून कृषी क्षेत्रातही अनेक तरतूदी केल्या गेल्या आहेत.

- Advertisement -

देशात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एमएसएमई क्षेत्राला निधी देण्यात आला आहे. देशात अनेक रुग्णालयेही उभारण्यात येणार आहेत. यातून तरुणांना मोठ्या प्रामाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या बजेटमध्ये कोणताही बोजा सामान्य नागरिकांवर टाकला नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -