घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: 'या' पाच मुद्द्यांवर फडणवीसांनी केले विश्लेषण

Union Budget 2021: ‘या’ पाच मुद्द्यांवर फडणवीसांनी केले विश्लेषण

Subscribe

'अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे',अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प Union Budget 2021 सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री सीतारमण यांचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे ‘अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे’,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील बरेच मुद्दे घेऊन हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला चालना देणारा कसा आहे, याबाबत सांगितले.

मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, २०३० पर्यंत हायटेक रेल्वे आणणार आहे. दरम्यान, रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रासाठी निर्मला यांनी मोठी घोषणा केली असून त्यात त्यांनी नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली. यावर फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाशिक आणि नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

आरोग्यावर अधिक भर

गेल्यावर्षी सरकारकडून अर्थसंकल्पात ९२ हजार कोटी रूपयांची आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद केली होती. मात्र, यंदा या तरतूदीमध्ये १३७ टक्क्यांची वाढ केली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.

भारतात पहिल्यांदाच डीजिटल जनगणना

अगामी वर्षात देशाची १६वी जनगणना करण्यात येत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा डिजीटल ॲपच्या माध्यमातून सर्व नागरिकांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ७६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी घरोघरी जाऊन जनगणना केली जायची ती आता मोबाई ॲद्वारे केली जणार आहे.

- Advertisement -

वाहनांची होणार ‘फिटनेस टेस्ट’

देशातील खासगी आणि व्यावसायिक वाहनांची फिटनेस टेस्ट केली जाणार आहे. (Union Budget 2021) च्या अर्थसंकल्पात ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’चा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार खासगी वाहनांची २० वर्षानंतर फिटनेस टेस्ट केली जाणार आहे. तर व्यावसायिक वाहनांची १५ वर्षानंतर टेस्ट केली जाणार आहे.

१०० नव्या सैनिक शाळा उभारणार

देशातील शिक्षण व्यवस्थेला गतीमानता देत अमुलाग्रह बदल आणि सुधारणा करण्यात येणार आहेत. याअंतर्गत १०० नव्या सैनिक शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेतली जाणार असून कायद्यात सुधारणा करुन उच्च शिक्षण आयोग स्थापना केला जाणार आहे.

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरला, असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


हेही वाचा – Union Budget 2021: खासगीसह व्यावसायिक वाहनांची होणार ‘फिटनेस टेस्ट’


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -