घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022 on App : आता इंग्रजीबरोबर हिंदीतही वाचता येणार अर्थसंकल्प; केंद्राने...

Budget 2022 on App : आता इंग्रजीबरोबर हिंदीतही वाचता येणार अर्थसंकल्प; केंद्राने लाँच केलं अ‍ॅप

Subscribe

डिजिटल संसद मोबाईल अॅपवरही मिळणार माहिती

केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या दिवशी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. मात्र या अर्थसंकल्पाची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी म्हणून आता केंद्र सरकारने एक नवं मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता इंग्रजीसोबत हिंदी भाषेतही नागरिकांना अर्थसंकल्पाची माहिती घेता येणार आहे. युनियन बजेट असे या मोबाईल अ‍ॅपचे नाव आहे.

सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाची माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच या अ‍ॅपवर आपल्याला हिंदी आणि इंग्रजी भाषेत अर्थसंकल्पाची माहिती मिळणार आहे. त्यामुने नागरिकांना आवडत्या भाषेत अर्थसंकल्प समजून घेण्याची ही एक संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे अर्थसंकल्पाची एक विश्वसनीय माहिती मिळण्यास मदत होईल.

- Advertisement -

कसे डाऊनलोड करायचे?

१) युनियन बजेट मोबाईल अ‍ॅप तुम्ही http://indiabudget.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करु शकता.

२) तसेच गुगर प्ले स्टोरवरूनही हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते.

- Advertisement -

डिजिटल संसद अ‍ॅपवरही मिळणार माहिती

सर्वसामान्य नागरिकांना आता केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती डिजिटल संसद अ‍ॅपवरूनही घेता येणार आहे. या अ‍ॅपवर अर्थसंकल्पाचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाजही लाईव्ह पाहता येईल. 1947 सालापासून ते आतापर्यंतचे अर्थसंकल्प आणि त्यावरील चर्चा यांची माहिती या अ‍ॅपवर मिळेल.


‘अतरंगी रे’च्या यशानंतर चमकले धनुषचे नशीब; बॉलिवूडचे दोन मोठे प्रोजेक्ट केले साईन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -