घरताज्या घडामोडीUnion Budget 2022 Live Updates: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित 

Union Budget 2022 Live Updates: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित 

Subscribe

लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

- Advertisement -

 


इन्कम टॅक्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही – निर्मला सीतारामन

- Advertisement -

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर सेन्सेक्स १ हजार अंकांनी वधारला


संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर अधिक भर दिला जाणार – निर्मला सीतारामन


देशातल्या मोठ्या ५ टाऊनशिपमध्ये शैक्षणिक संस्था उभारणार – निर्मला सीतारामन


इलेक्ट्रिकल व्हेईक्लसाठी बॅटरी स्वॉपिंग पॉलिसी (इंटर ऑपरेटेबिलिटी स्टॅण्डर्ड्स) अंमलात आणली जाईल, चार्जिंग स्टेशनच्या जागेची कमतरता पाहता ही योजना अंमलात आणण्यात येणार – निर्मला सीतारामन


बँटरी आणि एनर्जी क्षेत्रात काम केल्या जाणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल – निर्मला सीतारामन


ई-पासपोर्ट सुविधा अधिक सुलभ केली जाणार – निर्मला सीतारामन


ई-पासपोर्ट एम्बेडेड चीप रोल पासपोर्ट आऊट २०२२-२३ मध्ये करण्यात येणार – निर्मला सीतारामन


उद्योग धंदे सुरू करण्यासाठी जुन्या प्रक्रिया रद्द


बँकांमध्ये मिळणाऱ्या सुविधा पोस्ट ऑफिस देतील – निर्मला सीतारामन


डिजिटल पेमेंटसाठी सुरू असलेल्या सवलती जारी राहणार – निर्मला सीतारामन


मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन देणार – निर्मला सीतारामन


ईशान्य भारतातील राज्यांसाठी मोदी सरकारची विशेष योजना

ईशान्य भारतातील राज्यांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद


पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहेत – निर्मला सीतारामन


पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८० लाख घरे बांधण्यात येणार – निर्मला सीतारामन


हर घर नल से जल योजनेअंतर्गत ६० कोटी तरतुद
३.८ कोटी घरांना २०२२-२३ मध्ये पाण्याची जोडणी मिळणार


२ लाख अंगणवाड्यांचे सक्षमीकरण केले जाणार – निर्मला सीतारामन


नॅशनल टेली मेंटल हेल्थ सेंटरची देशात उभारणी करण्यात येणार. देशात एकुण २३ केंद्र उभारण्यात येणार (आयआयटी बंगळुरू तंत्रज्ञानाचा सपोर्ट करणार)


कोरोनामुळे मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे समजले आहे. त्यामुळे केंद्र सरकार मानसिक आरोग्य संदर्भात मोठी घोषणा केली जाणार आहे. – निर्मला सीतारामन


शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेलची घोषणा, स्थानिक भाषेत शिकवले जाणार – निर्मला सीतारामन


ड्रोनच्या प्रशिक्षणाचा देशातील निवडक आयटीआय कोर्सेसमध्ये समावेश होणार – निर्मला सीतारामन


ट्रोन शक्ती माध्यमातून स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन दिले जाईल – निर्मला सीतारामन


मध्यम आमि लघू उद्योजनकांसाठी २ लाख कोटींचे अर्थसहाय्य ठेवण्यात आले आहे. – निर्मला सीतारामन


ड्राफ्ट डीपीआर पाच नद्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी तयार करण्यात आला आहे. लवकरच याचे काम सुरू केले जाणार आहे – निर्मला सीतारामन


तेलबियांची आयात रोखण्यासाठी देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणार – निर्मला सीतारामन


किसान ड्रोन्सचा शेतातील विविध कामांसाठी उपयोग करण्यात येणार – निर्मला सीतारामन


केमिकल फ्री नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार – निर्मला सीतारामन


झीरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन देण्यात येणार – निर्मला सीतारामन


कृषी आधारीत स्टार्ट अप्सला प्राधान्य दिलं जाणार आहे. नाबार्डकडून आर्थिक मदत करण्याची योजना आहे. – निर्मला सीतारामन


येत्या ३ वर्षात ४९० नव्या वंदे भारत ट्रेन्सची सुविधा दिली जाईल. यामध्ये मॉडन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल – निर्मला सीतारामन


देशात २५ हजार किलोमीटरचे रस्ते विकसित केले जाणार – निर्मला सीतारामन


येत्या आर्थिक वर्षात चार लॉजिस्टिक पास निर्माण केले जातील – निर्मला सीतारामन


रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक करणार – निर्मला सीतारामन


पंतप्रधान गती योजना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आहे. या सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करणार आहेत.


एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार – निर्मला सीतारामन


भारताचा विकास दर ९.२७ टक्के असण्याचा अंदाज आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.


२०१४ पासून आमच्या सरकारचे उद्दिष्ट सर्व नागरिकांचे कल्याण आणि त्यांना बळ देणे आहे.


हा केंद्रीय अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांच्या ‘अमृत काल’वर अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचा आणि ब्लू प्रिंट देण्याचा प्रयत्न करतो : निर्मला सीतारामन


कोरोनाच्या काळात आर्थिक चणचणीला सामना करावा लागला त्याच्या प्रति मी संवेदना व्यक्त करते, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.


९.२ टक्के देशाचा विकास दर अपेक्षित, जागतिक पातळीवर मोठ्या आर्थिक सत्तांमध्ये भारताची कोरोना काळातील आव्हानातही चांगली कामगिरी


संसदेच्या कामकाजाला सुरुवात


केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्प २०२२ मंजूर केले असून थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असून अर्थसंकल्पावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.


अर्थसंकल्प २०२२ मांडण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. १०.१५ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयातून निघाल्या.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. आज सकाळी ११ वाजता निर्मला सीतारामन अर्थसंकल्प २०२२-२३ सादर करणार आहेत.


वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड यांचे अर्थ मंत्रालयात पोहोचले.


अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करणार चौथा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सलग चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरू झाले आहे. केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा केली आहे. तसेच कोरोना काळात काय उपाययोजना केल्या याबाबत राष्ट्रपतींनी माहिती दिली आहे. तसेच कोरोना काळात केलेल्या कामामुळे केंद्राचे राष्ट्रपतींनी कौतुक केलं. दरम्यान देशाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार कोणत्या कोणत्या घटकांना दिलासा देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प २०२२-२३ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -