घरदेश-विदेश'आधी डेटॉलने तोंड धुऊन या...', भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सीतारामन यांचा काँग्रेसला टोला

‘आधी डेटॉलने तोंड धुऊन या…’, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सीतारामन यांचा काँग्रेसला टोला

Subscribe

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 -24 वरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीकाँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या काही खासदारांनी केंद्रातील मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याच आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलण्याआधी डेटॉलने तोंड धुवून यावं, असा खोचक टोला सीतारामन यांनी लगावला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बिगर भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींबाबत संसदेत बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, तुम्ही (काँग्रेस) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलत आहात? यावर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना उद्देशून म्हणाल्या की, त्यांनी हिमाचल सरकारला विचारावं की, त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच डिझेलवर 3 रुपयांनी व्हॅट का वाढवला? ही काँग्रेसची संस्कृती आहे. ते आरोप करतील, सभागृहाबाहेर जातील पण ऐकणार नाहीत.

- Advertisement -

यावेळी सीतारामन यांनी पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवरही भाष्य केलं आहे. सीतारामन म्हणाल्या की, पंजाबने फेब्रुवारी 2023 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट वाढवला आहे, ज्यामुळे किंमत सुमारे 95 रुपये प्रति लिटरने वाढेल. या किमती कमी होत नाही. केरळमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील सेस 2 रुपयांनी वाढवला. काही राज्यांनी थोडे पैसे कमी केले आहेत, तर अजूनही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर पैसे कमी केले नाहीत.

- Advertisement -

सीतारामन म्हणाल्या की, पश्चिम बंगालनं पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत, तामिळनाडूनं काही किमती कमी केल्यात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंडनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत. यावेळी अन्न आणि खतांच्या अनुदानात कपात केल्याचा विरोधकांचा आरोप सीतारमण यांनी फेटाळून लावत म्हटले की, फर्टिलायझर आयातीचा अतिरिक्त खर्च याआधीही शेतकऱ्यांवर लादण्यात आला नाही. या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांवर बोजा टाकला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अशोक गेहलोत यांच्यावर साधला निशाणा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना गेल्या वर्षाीचा जुना अर्थसंकल्प सादर केला, यावरून निर्मला सीतारामन यांवनी अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. सीतारामन म्हणाल्या की, राजस्थानमध्ये गोंधळ आहे, भाऊ, गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प यंदा वाचला आहे. चुका कोणाकडूनही होऊ शकतात, पण मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचावा लागेल अशी परिस्थिती कोणाच्याही समोर येऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करते.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी 2023-24 या अर्थसंकल्पाऐवजी मागील अर्थसंकल्पातील काही भाग चुकून वाचून दाखवला. मात्र नंतर त्यांनी आपली चूक मान्य करत अर्थसंकल्पाचे पहिले पानच चुकीचे असल्याचे सांगितले.


निलंबनानंतर खासदार रजनी पाटील आक्रमक; म्हणाल्या – पूर्ण टर्म निलंबित करा, परंतु…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -