घरअर्थजगतUnion Budget 2023 : सरकारकडून महिलांसाठी मोठं गिफ्ट, महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

Union Budget 2023 : सरकारकडून महिलांसाठी मोठं गिफ्ट, महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

Subscribe

Union Budget 2023 : यानुसार महिला दोन लाखांपर्यंतची गुंतवणूक दोन वर्षांकरता करण्यात येणार आहे. 

Union Budget 2023 : नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. यानुसार महिला बचत सन्मान पत्र आणले गेले आहे. यानुसार महिला दोन लाखांपर्यंतची गुंतवणूक दोन वर्षांकरता करु शकणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेविषयी माहिती देताना म्हटलं की, या बचत योजनेचा लाभ गृहिणी २०२५ पर्यंत घेऊ शकतात. महिला या योजनेत २ लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात. यातून त्यांना तब्बल ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. तर, या गुंतवणुकीतून महिला छोट्या छोट्या रक्कमाही काढू शकतात.

- Advertisement -

तसंच, ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठीही घोषणा करण्यात आली आहे. ८१ लाख बचतगटांना केंद्र सरकारकडून मदत करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील स्त्रीयांना बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही निर्माला सीतारामन यांनी सांगितलं.

रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा

यासह रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा केली आहे. यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. 2022-23 मध्ये रेल्वेच्या कायापालटासाठी 2.4 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती.

- Advertisement -

या निधीतून रेल्वेचे नवीन ट्रॅक तयार करणे, हायस्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवणे, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करणे यावर भर दिला जाणार आहे.

आता गरिबांना वर्षभर मिळणार मोफत रेशन

केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सुरु केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी 1 वर्षांनी वाढवण्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे आता देशातील गरीबांना पुढील वर्षभर रेशन दुकांनावर मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात या योजनेविषयी माहिती दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे, अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -