घरअर्थसंकल्प २०२२हा तर दगाबाज सरकारचा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका

हा तर दगाबाज सरकारचा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका

Subscribe

एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असे जाहीर करायचे आणि दुसरीकडे कापूस आयातीचे धोरण राबवायचे हा मोदी सरकारचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका दानवे यांनी केली. दानवे यांनी वित्तीय तुटीवरही भाष्य केले. ते म्हणाले, २०१४ पासून मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे. २०१४च्या तुलनेत आता पाहिल्यास मोठया प्रमाणात वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झाली आहे.

Union Budget 2023 : नवी दिल्ली – भाजप सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे दगाबाज सरकारचा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, कष्टकरी व मध्यमवर्गीय यांचा केवळ मतांसाठी कसा वापर होईल याचे ध्येय समोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी केली.

ते म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी व महिलांची निराशा करणारा आहे. अर्थसंकल्पात फलोत्पादन, सहकार सारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. कापूस उत्पादकांना भरघोस मदत करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात केली. तर दुसरीकडे सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करण्याचा निर्णय का घेतला असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असे जाहीर करायचे आणि दुसरीकडे कापूस आयातीचे धोरण राबवायचे हा मोदी सरकारचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका दानवे यांनी केली. दानवे यांनी वित्तीय तुटीवरही भाष्य केले. ते म्हणाले, २०१४ पासून मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे. २०१४च्या तुलनेत आता पाहिल्यास मोठया प्रमाणात वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झाली आहे.

बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. हा अर्थसंकल्प म्हणजे प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. सर्व घटकांचा विचार करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वजन हिताय असा हा अर्थसंकल्प आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान आधारभूत किंमत या प्रश्नांवर अर्थमंत्र्यांनी भाष्य केले नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -