देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक, म्हणाले…

सर्वजन हिताय या संकल्पनेवर आधारीत अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला. समाजातील शेवटच्या व्यक्तिचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजनक व युवा, अशा सर्वच स्तरांचा विचार करुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वांनाच अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार आहे. 

संग्रहित छायाचित्र

 

Union Budget 2023 : नवी दिल्ली – येत्या २५ वर्षांत भारताला विकसित भारत म्हणून ओळख देणारा आजचा अर्थसंकल्प होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे कौतुकही केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वजन हिताय या संकल्पनेवर आधारीत अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. समाजातील शेवटच्या व्यक्तिचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजनक व युवा, अशा सर्वच स्तरांचा विचार करुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वांनाच अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार आहे.

या अर्थसंकल्पाला विविध उपमाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.  या अर्थसंकल्पाला ग्रोथ बजेट म्हणता येईल, ग्रीन बजेट म्हणता येईल, पायाभूत सविधांचे बजेट म्हणता येईल, याला मध्यमवर्गीयांचं बजेट म्हणता येईल.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवले जात आहे. प्राथमिक कृषी संस्थांना बहुउद्देशीय संस्थांची मदत मिळणार आहे. यासोबतच रोजगार निर्मितीवरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. दहा लाख कोटी रूपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पात गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

डिजिटल व टेक्नॉलॉजची यांची सांगड घालणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच साखर कारखान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकलप् आहे. साखर कारखान्यांना जुना आयकर लागू होणार नाही, अशी भेट या अर्थसंकल्पातून साखर कारखान्यांना देण्यात आली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यांचे महसुल वाढवण्याचे काम अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. राज्यांना ५० वर्षांचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे राज्यांच्या पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक वाढवण्यास मदत मिळणार आहे. तरुणांसाठी व स्टार्टअपकरिता रोजगार निर्मिती करणाऱ्या योजना जाहीर झाल्या आहेत. लघु उद्योजकांसाठी दोन लाख कोटी रुपयांची क्रेडिट गॅरेंटी सरकार देणार आहे. त्यांच्या कर्जातही एक टक्क्यांनी कपात होणार आहे. कोविड काळात अपयशी झालेले उद्योग पुन्हा उभे राहण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प प्रत्येक घटकाला दिलासा देणारा ठरला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.