घरदेश-विदेशUnion Budget 2023 live : अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळालं, वाचा एका क्लिकवर

Union Budget 2023 live : अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळालं, वाचा एका क्लिकवर

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा 2023 – 24 चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य, रेल्वे, महिला सशक्तीकरण, युवा यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु यातून गरीब, मध्यम वर्गीय, महिला, युवक आणि व्यावासायिकांना काय मिळालं हे सोप्प्या भाषेत जाणून घेऊ..

1) महिलांसाठी विशेष महिला सम्मान बचत पत्र योजना सुरु करण्यात आली आहे. यातून महिलांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5 टक्के मिळणार आहे.

- Advertisement -

2) वरिष्ठ नागरिक बचत योजनेच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा खर्च 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात 30 लाख रुपये जमा केले जाणार आहे.

3) मासिक उत्पन्न योजनेत पैसे जमा करण्यासाठीची 4.5 लाखांची मर्यादा आता 9 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर या योजनेअंतर्गत तुमचं संयुक्त खातं असेल तर पैसे जमा करण्याची प्रत्येक महिन्याला 9 लाखांपर्यंत असलेली मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत केली आहे.

- Advertisement -

4) शेती किंवा शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नव्या योजनेची घोषणा करण्यात आली नाही. परंतु शेतकऱ्यासाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. शेतीसंबंधीत नव्या गोष्टी आणि स्टार्टअप्सला विशेष प्रोत्साहन दिले जाईल, यासाठी Agriculture Accelerator Fund ची स्थापन केली जाईल.

5) भारतात मोठ्या प्रमाणात भरडधान्याचं उत्पादन घेतलं जात, त्यामुळे भारतातील भरडधान्याला जागतिक बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी श्री अन्न योजनेअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेतून भरडधान्यासाठी भारतात ग्लोबल हब तयार केले जाणार आहे.

6) पंतप्रधान ऋण योजनेअंतर्गत 22 लाख कर्जाचं वाटप केलं जाणार आहे.

7) देशात 157 नवे नर्सिंग कॉलेज उभारणार

8) ICMR लॅबमध्ये खासगी सहभागाने संशोधनाला चालना दिली जाणार

8) शेतकऱ्यांसाठी कृषी वर्धन निधीची स्थापना

9) देखो अपना देश योजनेअंतर्गत भारतातील पर्यटन विकासाला चालना दिली जाईल. तर स्वदेश दर्शनमधून ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना दिली जाईल. यात विशेषत: सीमावर्ती भागातील पर्यटनावर भर दिली जाईल.

10) एक जिल्हा एक उत्पादन मार्केटिंगसाठी प्रत्येक राज्यात युनिटी मॉल बांधणार आहे.

11) केवायसी प्रक्रिया जलद करण्यासाची पॅन कार्डचं अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे.

12) कृत्रिम हिरे उत्पादनाला चालना दिली जाणार आहे.

13) रोजगार निर्मितीसाठी देशात 10 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल.

14) यात भारतीय रेल्वेसाठी 2 लाख 40 रुपयांची आर्थिक तरतुद आहे. यात हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅक तयार करण्यावर भर दिला जाईल.

15) देशात नवे 50 विमानतळ आणि हेलिपॅड्सची पुनर्बांधणी केली जाईल.

16) आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ला प्रोत्साहन देण्यासाठी 3 केंद्रांद्वारे काम केले जाईल, यासाठी मेक एआय फॉर इंडिया, मेक एआय इन इंडिया योजना काम करणार आहेत.

17) जुन्या प्रदूषण निर्माण करणारी सरकारी वाहन वापरा बाहेर केली जातील.

18) एमएसएमई ही सरकारी करारातील नुकसानीची भरपाईसाठीची नवी योजना आहे.

19 ) 5G चा प्रसार आणि संशोधन करण्यासाठी देशभरात 100 लॅब उभारले जाणार आहेत.


Union Budget 2023 : सरकारी योजनांसाठी ‘नो स्ट्रेस’, कारभार होईल ‘पेपरलेस’, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -