घरBudget 2024Union Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात 'या' घोषणा होण्याची शक्यता ? वाचा...

Union Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात ‘या’ घोषणा होण्याची शक्यता ? वाचा सविस्तर

Subscribe

यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा असणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा नसल्या तरी देशातील जनतेला खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सीतारामन या  अर्थमंत्री म्हणून सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशात एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार नाही. पण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी केंद्र सरकार काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे.

यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा असणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा नसल्या तरी देशातील जनतेला खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि यामुळे सर्वसामान्यांना झालेला फायद्यांवर अर्थमंत्री अधिक जोर देताना दिसतील.

- Advertisement -

देशाचा आर्थिक विकास दर

देशाच्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे, तर आगामी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देखील असाच अंदाज कायम राहणार आहेत. यामुळे आरबीआयकडून देखील व्याजदर कपातीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यात वर्तवली जात आहे. केंद्र सरकारकडून 2021 साली नवीन टॅक्स रेजीम आणण्यात आले होते. यानंतर त्यात सूसूत्रता आणण्यासाठी आणि नव्या रेजीममध्ये करात सूट देण्याचा प्रयत्न केला होता. अंतरीम अर्थसंकल्पात कर सूट मर्यादा वाढू शकते. यामुळे जुन्या टॅक्स रेजीमचाच फायदा अनेकांकडून घेतला जात असताना नव्या रेजीममवर करदात्यांना अणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाऊ शकतो.

हेही वाचा – GST Collection : जानेवारीत जीएसटी संकलनात दमदार वाढ, अर्थसंकल्पापूर्वी मिळाली चांगली बातमी

- Advertisement -

रेल्वेसाठी किती बजेट असणार?

आ अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता नकारता येत नाही. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त निधी मिळण्याची आशा आहे. गत वर्षी अर्थसंकल्पात 25 टक्क्यांनी जास्त असू शकतो. देशातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढणे, रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण करणे, फ्रेट कॉरिडॉर आणि सुधारित सुरधा वैशिष्ट्ये आदी विकासकामासह रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार मोठी रक्कम अर्थसंकल्पात देऊ शकते.

नवी हायब्रीड पेन्शन योजना आणणार?

देशातील अनेक राज्यात जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेतले असून नव्या पेन्शन योजनेसंदर्भात देशभरात रोष दिसून येत आहे. यामुळे केंद्र सरकार कदाचित हायब्रीड पेन्शन योजना आणली जाऊ शकते. गत वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये हायब्रीड पेन्शन योजण्या सरकारने सुचविली होती. या पेन्शनमध्ये तुमच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के हमी देणे शक्य आहे.

हेही वाचा – Hemant Soren : जमीन गैरव्यवहार प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक

मेक इन इंडियावर भर

या अंतरिम अर्थसंकल्पात मेक इन इंडियावर भर दिला जाऊ शकतो. यामुळे अर्थसंकल्प 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. यामुळे केंद्र सरकरा गत वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात वाढ करू शकते. यात संशोधन, निर्यात आणि मेक इन इंडियावर खास भर दिला जाऊ शकतो.

केंद्राकडून आरोग्यासाठी काय करणार

केंद्र सरकारकडून आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना आणण्यात आली होती. या योजनाची व्याप्ती वाढणार असून केंद्राकडून आरोग्य विमाबाबत मोठा भर दिला जात आहे. यात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत विमा रकमेची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. केंद्राकडून आरोग्य सेवा क्षेत्रासाठी नियामक आणण्याच्या पावले टाकली जाऊ शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -