घरताज्या घडामोडी'पीएम श्री स्कूल' मुलांच्या भविष्यासाठी देशभरात सुरू होणार, केंद्र सरकारचा निर्णय

‘पीएम श्री स्कूल’ मुलांच्या भविष्यासाठी देशभरात सुरू होणार, केंद्र सरकारचा निर्णय

Subscribe

देशभरातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात (Education) एक महत्वाची बातमी आहे. देशभरात आता 'पीएम श्री स्कूल' (PM Shree School) सुरू केल्या जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंक्षी धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी याबाबत घोषणा केली आहे.

देशभरातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात (Education) एक महत्वाची बातमी आहे. देशभरात आता ‘पीएम श्री स्कूल’ (PM Shree School) सुरू केल्या जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंक्षी धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी याबाबत घोषणा केली आहे. गुजरातमध्ये (Gujarat) झालेल्या शैक्षणिक धोरण (NEP) परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या शाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील आणि NEP 2020 साठी एक प्रकारची प्रयोगशाळा असेल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या सरकारला यंदा ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त काही नव्या योजना सरकारने आणल्या असून, यामधीलच ही एक योजना आहे. देशभरातील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ही योजना सुरू केली आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये देशभरातील शिक्षण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

“शालेय शिक्षण हा पाया आहे. २१ व्या शतकातील आपल्या नवीन पिढीचे ज्ञान आणि कौशल्य आपण अधिक समृद्ध केले पाहिजे. भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पुढील २५ वर्षे महत्त्वाची आहेत. त्याचसाठी पीएम श्री स्कूल स्थापन करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.”, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.

“याचा उद्देश विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य तयार करणं हा असेल. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेला पीएम श्री स्कूलच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले”, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या दरात ३० रुपयांनी वाढ; १ लीटर पेट्रोलची किंमत २०० रुपये पार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -