घरCORONA UPDATEडेल्टा व्हेरिएंटविरोधात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लस प्रभावी, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती

डेल्टा व्हेरिएंटविरोधात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लस प्रभावी, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती

Subscribe

देशात कोरोना विषाणुची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता केंद्रीय आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह अन्य किती देशांमध्ये सापडला आहे याची माहिती दिली आहे. यावर केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरिएंट भारतासह ८० देशांमध्ये सापडला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर हा व्हेरिएंट चिंतेचे कारण ठरला आहे.

परंतु या डेल्टा व्हेरिएंटवर कोणती लस प्रभावी आहे या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य सचिव सांगतात की, सध्या लसीकरण मोहिमेत आम्ही कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन या लसींचा वापर करत आहोत आणि या दोन्ही लसी डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत आहेत. परंतु या लसींमुळे डेल्टा व्हेरिएंटविरोधात शरीरात किती प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात. याची माहिती आम्ही लवकरचं जाहीर करु असेही लव अग्रवाल म्हणाले.

- Advertisement -

९ देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धुमाकूळ 

डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापर्यंत ९ देशांमध्ये आढळून आला आहे. हे देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया इ. डेल्टा प्लस व्हेरिएंटची आत्तापर्यंत २२ प्रकरणे भारतात आढळली आहेत. त्यापैकी रत्नागिरी, जळगाव (महाराष्ट्र) आणि केरळसह आणि मध्य प्रदेशात १६ प्रकरणे आढळली आहेत. यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्र येत एक जागतिक वेबिनारची योजना आखली आहे. या वेबिनारमध्ये इच्छुक देशांना आमंत्रित केले जाईल. या देशांसह भारत तंत्रज्ञान आणि निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

CoWIN अॅपचे केले कौतुक 

दरम्यान देशातील बहुतेक नागरिकांना लसीच्या रजिस्ट्रेशन करताना अनेक अडचणी येत आहेत. या समस्येवर राजेश भूषण म्हणाले की, टीका होत असतानाही कोविन (CoWIN)अॅपचे बहुतेक जण कौतुक करत आहेत. या अॅपने स्वतःला एक अतिशय मजबूत, सर्वसमावेशक, साधे आयटी-आधारित प्लॅटफॉर्म म्हणून प्रस्थापित केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, २१ जून रोजी देशभरात सोमवारी ८८ लाख ९ हजार कोरोनाविरोधी लसींचे डोस देण्यात आले. यातील ४० लाख ४३ हजार लसींचे डोस महिलांना तर ४७ लाख २४ हजार २८३ लसींचे डोस पुरुषांनी देण्यात आले.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! शिफ्टनंतर १५ मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास मिळणार ओव्हरटाईन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -