केंद्राचा मोठा निर्णय; 6 महिन्यांनी घेता येणार लसीचा Precaution Dose

केंद्र सरकारने यापूर्वी परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना संबंधित देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नऊ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीपूर्वी Precaution डोस घेण्यास परवानगी दिली होती

Union Health Ministry reduces gap for COVID-19 precaution doses from existing 9 months to 6 months for those above 18 years

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांसाठी COVID-19 विरोधी लसीच्या Precaution Dose मधील अंतर
9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भातील पत्र जारी केले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या या पत्रात म्हटले की, 18 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर लसीचा Precaution Dose डोस दिला जाईल. ज्यांनी कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना Precaution डोस दिला जात आहे. यापूर्वी कोरोनाविरोधी लसीचा Precaution डोस दोन डोस घेतल्यानंतर 9 महिने किंवा 39 आठवड्यांच्या अंतरानंतर दिला जात होता.

दरम्यान 60 वर्षांहून अधिक वयोगटातील लाभार्थी तसेच आरोग्य सेवा कर्मचारी (HCWs) आणि फ्रंट लाइन वर्कर्स (FLWs), यांना लसीच्या 2 डोसच्या तारखेपासून 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर Precaution डोस दिला जाईल. सरकारी लसीकरण केंद्रावर हा डोस मोफत उपलब्ध आहे. यासाठी आता CoWIN लसीकरण सिस्टिममध्येही बदल केले जात आहेत. या लसीशी संबंधित माहिती कोविन अॅपवर अपलोड करण्यात आली आहे. असही या पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारने यापूर्वी परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना संबंधित देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नऊ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीपूर्वी Precaution डोस घेण्यास परवानगी दिली होती.


Dolo-650 औषध बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची धाड; कर चुकवेगिरीमुळे कारवाई