घरCORONA UPDATEMucormycosis : 'म्युकरमायकोसिस'चा साथीच्या आजारात समावेश, केंद्राकडून नवी नियमावली जाहीर

Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’चा साथीच्या आजारात समावेश, केंद्राकडून नवी नियमावली जाहीर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त झालेले अनेक रुग्ण ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे बळी ठरत आहेत. यामुळे देशात म्युकरमायकोसिस (Mucormycosis)अर्थात ब्लॅक फंगस आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान केंद्र सरकारनेही ‘म्युकरमायकोसिस’ आजाराची रुग्ण मोठ्याप्रमाणत आढळत असल्याचे मान्य केले आहे. यानंतर आज केंद्र सरकारने म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश साथीच्या आजारात केला आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचे नवनवीन रुग्ण समोर येत आहेत. राजस्थान आणि तेलंगणामध्ये वाढत्या रुग्णांमुळे म्युकरमायकोसिस आजाराला याआधीच महामारी घोषित केले होते. त्यापाठोपाठ केंद्र सरकारानेही म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये केला आहे. केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून केंद्र आरोग्य विभाग सहाय्यक सचिव लव अगवाल यांनी यासंदर्भातील विस्तृत माहिती जाहीर केली आहे.

त्यामुळे देशातील सर्व खासगी- सार्वजनिक रुग्णाले, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करताना साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये दिलेल्या नियमवालींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. केंद्राच्या निर्णयामुळे आता रुग्णांची तपासणी, उपचार आणि या आजारावरील व्यवस्थापन करताना साथरोग नियंत्रण कायद्यातील नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. सर्व राज्यांचा राज्य सरकारनेही म्युकरमायकोसिस’ हा साथीचा आजार म्हणून जाहीर करावा असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

- Advertisement -

संशयित आणि बाधित रुग्णांची माहिती देणे बंधनकारक

प्रत्येक राज्याने साथरोग कायद्यांतर्गत म्युकरमायकोसिस’ आजारासंदर्भात व्यवस्थापन करावे अशा लिखित स्वरुपातील सुचना केंद्रीय आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगवाल यांनी प्रत्येक राज्याला दिल्या आहेत. आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रामध्ये, राज्यांना विनंती आहे की, म्युकरमायकोसिसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. तसेच सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र आणि वैद्यकीय महाविद्यालांमध्ये या आजारासंबंधीच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करावे, यामध्ये या आजारासंबंधीत रुग्णाची तपासणी, आजारांच निदान आणि त्यावरील उपचार व्यवस्थापन करताना केंद्रीय आरोग्य विभाग आणि आयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. याशिवाय म्युकरमायकोसिसच्या संशयित आणि बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आरोग्यविभागाला पुरवली जावी, यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेळ असेले, असे नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. वैद्यकीय आरोग्य समस्या असलेल्यांना हा आजाराचा सर्वाधित धोक संभवतो. या आजारामुळे रोगाशी लढण्याची नैसर्गिक शक्ती कमी होते. हा आजार फार दुर्मिळ आहे. मात्र महाराष्ट्रात काही दिवसांपासून त्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे योग्यवेळी निदान होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिस कोणाला होतो?

वैरिकानाझोल थेरपी घेणाऱ्या व्यक्तीला त्याचप्रमाणे अनियंत्रित डायबिटिज असलेले रुग्ण, रक्तात साखरेचे प्रमाण वाढले असेल किंवा उपचारांदरम्यान स्टिरॉइड दिलेल्या रुग्णांमध्ये किंवा बरेच दिवस ICUमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. डोळ्यांभोवती वेदना होणे किंवा डोळे लाल होणे, ताप येणे, डोकेदुखी,खोकला,श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या होणे, मानसिक स्थिती बदलणे ही म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -